पश्चिम महाराष्ट्र

Belgaum Election Result Live 2021 - मतमोजणी सुरु

मिलिंद देसाई

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखीत मतमोजणीचे काम हाती.

बेळगाव : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिली फेरीत प्रभाग क्रमांक 18 ते प्रभाग क्रमांक 1, 15, 3, 17, 14, 52, 11, 40, 21, 12, 29 मधील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. (Belgaum Election Result Live 2021) महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. यावेळी पहिल्यांदाच महाराष्ट्र शिक्षण समितीच्या विरोधात राष्ट्रीय पक्ष रिंगानात उतरल्याने सर्वांचे लक्ष मत मोजणीकडे लागून राहिले आहे. (Belgaum Election 2021) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखीत मतमोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होत असल्याने सर्व निकाल लवकर हाती येण्याची शक्यता आहे. (Belgaum Update)

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. तसेच कोरोनामुळे विजयी उमेदवार व समर्थकांवर विजयोत्सव साजरा करण्यास निर्बंध घालण्यात आल्याची माहिती दिली आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर प्रचंड प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून उमेदवार व पोलिंग एजंट वगळता कोणालाही आत सोडले जात नसून उमेदवारांच्या समर्थकांनी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच सर्वांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT