वीज खांब पडले  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : पंधरा दिवसांत ११७ खांब पडले

विजेसाठी कर्मचाऱ्यांकडून दिवस-रात्र काम

राजेश नागरे

बेळगाव : जोरदार वळवामुळे हेस्कॉमला पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा मोठा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या वळवामुळे शहरात २५ खांबांचे नुकसान झाले आहे. नवीन खांब उभारण्यासाठी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच १५ दिवसात ११७ वीज खांब तुटून पडले आहेत.

काही दिवसांपूर्वी झालेल्या वळवामुळे शहरासह बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यात ९२ वीज खांब पडले होते. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. कर्मचाऱ्यांना हे खांब उभे करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागला होता. तसेच यावेळी हेस्कॉमला तीस लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर मंगळवारी शहरात झालेल्या जोरदार वळवामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज तारांवर तुटून पडल्याने किल्ला परिसरात ३ , कॅम्प येथे ५ यांसह वडगाव, कॉलेज रोड, नेहरुनगर, बॉक्साईट रोड यांसह विविध ठिकाणी २५ खांब कोसळले. त्यामुळे शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत ठप्पच होता. काही भागातील काम बुधवारी दिवसभर सुरू होते.

सर्वाधिक वीज खांब हेस्कॉम उपविभाग क्रमांक ३ व १ मध्ये पडले आहेत. तर उपविभाग क्रमांक २ मध्ये तीन खांब पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. हेस्कॉमकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे अगोदरच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असताना वीज खांब पडल्यामुळे शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र काम करावे लागत आहे. हेस्कॉमकडून भूमिगत वीजपुरवठा करण्यासाठी वीज वाहिन्या घातल्या असल्या तरी शहरात आजही वीज तारांचे जाळे आहे. मात्र वीज तारांवर झाडांच्या फांद्या पडत असल्याने खांब पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT