बेळगाव
बेळगाव  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : अन नाग्या बैलाच्या अंत्ययात्रेसाठी हजारो लोक रस्त्यावर

मिलिंद देसाई

बेळगाव : एखाद्या महान व्यक्तीचे किंवा समाजात स्थान असलेल्या व्यक्तीचे निधन झाले तर हजारो लोक अंत्य यात्रेसाठी मोठया संख्येने उपस्थित होतात. मात्र रविवारी वडगाव येथे एका शेतकऱ्याच्या बैलाचे निधन झाले आणि संपुर्ण वडगाव आणि परिसर शोकसागरात बुडाला आणि हजोरो लोक अंत्यसंस्कारासाठी रस्त्यावर उतरले.

कारभार गल्ली वडगाव येथील पाखरे कुटुंबाच्या नाग्या या बैलाने कर्नाटक व महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत नाव कमविलेल्या नाग्या या बैलाचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर निधनाची वार्ता बेळगाव परिसरात समजताच शर्यतप्रेमींनी हळहळ व्यक्त करून वडगाव परिसरात एकच गर्दी केली होती. कारभार गल्लीतील शर्यत प्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांनी 21 वर्षांपूर्वी "नाग्या" बैलाची 1 लाख 62 हजार रुपयाला अंकलगी येथून खरेदी केली होती. त्यानंतर अनगोळ येथे झालेल्या बैलगाडी शर्यतीत नाग्याने पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर परिसरातील शर्यत प्रेमींच्या गळ्यातील नाग्या ताईत बनला होता.

नाग्याने आजवर 500 हून शर्यतीमध्ये पहिला क्रमांक मिळविला होता त्यामूळे त्याला हिंदकेसरी नाग्या बैल म्हणुन ओळखले जात होते. तसेच नाग्या ज्या वेळेला शर्यतीला जायचा त्यावेळी त्याच्याभोवती लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गर्दी जमा होत होती यावरून नाग्याची प्रसिद्ध पहावयास मिळत होती. नाग्या बैलाचे निधन झाल्यानंतर मारुती पाखरे व संजय पाखरे यांच्या निवासस्थानापासून दुपारी 2 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये नाग्या बैलाचे पार्थिव ठेऊन वडगावच्या विविध भागातून मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी भजनी मंडळ होते तसेच ठीक ठिकाणी बैलाला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर वडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या मुलाच्या वाढदिवसाप्रमाणे पाखरे कुटुंबीय गेली अनेक वर्ष नाग्या बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करत होते. तसेच या बैलाच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना जेवण व अल्पवहाराचे वाटप केले जात होते. त्यामुळे नाग्या बैलाच्या वाढ दिवसाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT