पश्चिम महाराष्ट्र

प्राध्यापकांच्या लसीकरणाचे काम पूर्ण न झाल्यास परिक्षेवर बहिष्कार

मिलिंद देसाई

बेळगाव : बारावीच्या परीक्षेपूर्वी राज्यातील सर्व प्राध्यापकांच्या लसीकरणाचे(covid 19 vaccine)काम पूर्ण करावे अन्यथा बारावी परीक्षेच्या कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा इशारा पदवीपूर्व प्राध्यापक संघटनेतर्फे देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्यावर्षी बारावी परीक्षा आणि मूल्यमापनाच्या कामात सहभाग घेतलेल्या 11 प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. belgaum-professor-association-warning-from-the-government-belgaum-news

सध्या कोरोनामुळे 24 मे पासून सुरू होणारी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी सात जून नंतर परीक्षेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या अगोदर राज्यातील सर्व प्राध्यापकांच्या लसीकरणाचे काम सरकारने हाती घ्यावे तसेच प्राध्यापकांना फ्रंटलाइन वारियर्स समजून त्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात सरकारी व खाजगी पदवीपूर्व महाविद्यालयात 23000 तर विनाअनुदानित महाविद्यालयात 18000 प्राध्यापक कार्य करीत आहेत. 2020 मध्ये परीक्षा आणि मूल्यमापनाच्या कामासाठी 54 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. यामधील वीस दिवस दररोज शिक्षकांना मूल्यमापनाचे काम हाती घ्यावे लागले होते. यासाठी 18 हजार 177 प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती.

राज्यातील बेळगाव धारवाड गुलबर्गा बंगळूर यासह विविध भागातील 53 केंद्रावर मूल्यमापनाचे काम हाती घेण्यात आले होते. या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. तरीही अनेक प्राध्यापकांना व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी काही जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळेच सरकारने तातडीने प्राध्यापकांच्या लसीकरणासाठी पावले उचलावीत अन्यथा बारावीच्या परीक्षेवर आणि मूल्यमापनावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा प्राध्यापकांच्या संघटनेने दिला आहे. त्यामुळे सरकारला प्राध्यापकांच्या मागणीकडे लक्ष द्यावे लागणार असून कोरोना काळात परीक्षा घेताना पदवीपूर्व शिक्षण खात्याला बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. अशाच प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामात भाग न घेण्याचा निर्णय घेतला तर शिक्षण खात्याची मोठ्याप्रमाणात डोकेदुखी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT