नैराश्यातून आत्महत्या sakal
पश्चिम महाराष्ट्र

'तो' तर गेलाच पण...; त्याच्या नैराश्यातून चाहत्याचीही आत्महत्या

पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अथणी : सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला आहे. या नैराश्यातून अथणी येथील एका युवा चाहत्याने शनिवारी (ता. ३०) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल बाबू गाडीवड्डर (वय 22) असे त्याचे नाव आहे. अथणी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चित्रपटसृष्टीसह सामाजिक व शैक्षणिक कार्यात भरीव कामगिरी केल्याने अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या भोवती एक प्रकारचे वेगळे वलय होते. परिणामी ग्रामीण भागापर्यंत त्यांचा चाहता वर्ग होता. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक मान्यवरांसह संस्थांनीही शोक व्यक्त केला.

दहावीपर्यंत शिक्षण घेऊन गवंडी काम करणारा राहुल गाडीवड्डर हा त्यांचा मोठा चाहता होता. त्याला पुनीत राजकुमार यांचे चित्रपट खूप आवडत. त्यांचे चित्रपट पाहण्याचा छंदच त्यांना जडला होता. मोबाईलवर सातत्याने तो चित्रपट पाहत असत. मात्र पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समजताच शुक्रवारी (ता. २९) दिवसभर तो खूपच निराश होता.

त्यातूनच शनिवारी (ता. ३०) आपल्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्याआधी पुनीत राजकुमार यांच्या प्रतिमेचे पूजन करून फुले वाहून श्रद्धांजली वाहिली होती. यावरून त्याचे पुनीत राजकुमार यांच्यावर असलेले प्रेम दिसून येते.

कमालीचे नैराश्य आल्याने पुनीत राजकुमार पाठोपाठ राहुल यानेही आपली जीवन यात्रा संपविली. त्याबद्दल अथणी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अथणी सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्याच्या चाहत्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. राहुल याच्या मागे आई, वडील व पत्नी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT