पश्चिम महाराष्ट्र

अवकाळी पावसाचा पिकांना फायदा

राजकुमार शहा

मोहोळ : अवकाळी पावसाने मोहोळ तालुक्याला गेल्या दोन दिवसापासून झोडपले असून हा पाऊस मका, ऊस, ज्वारी, हरभरा या पिकांना फायदेशीर आहे. दरम्यान या पावसाने कारखान्याची ऊस तोडणी बंद झाली आहे.

संपूर्ण पावसाळा कोरडा गेला, त्या वेळी पाऊस पडला नाही त्यामुळे रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. विहीरी, बोअरची पाणी पातळी घटली आहे. परिणामी तालुक्यात चारा टंचाई जाणवू लागली आहे. मात्र या पावसामुळे आता मका, घास आदी चारा पिकांची लागवड करणे सोयीचे झाले आहे. बोर डाळींब, द्राक्ष, केळी या फळबागांनाही हा पाऊस फायदेशीर आहे. तसेच पापरी, खंडाळी परिसरातील वन विभागाच्या जंगलात हरिण, कोल्हे, लांडगे, ससे आदी प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली आहे.

दरम्यान तालुक्यातील जकराया, भिमा, लोकनेते या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे, मात्र जोरदार पडलेल्या पावसाने ऊसाच्या सरीत पाणी असल्याने ऊस तोडणी बंद झाली आहे. तालुक्यात मंडल निहाय पडलेला पाऊस

पुढील प्रमाणे :
शेटफळ 4 मिमी, कामती  9 मिमी, सावळेश्वर 15 मिमी, पेनूर  2 मिमी, मोहोळ  52.2 मिमी, वाघोली 13 मिमी, टाकळी सिकंदर 21 मिमी, नरखेड  27 मिमी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT