पश्चिम महाराष्ट्र

''पक्ष सोडण्यासाठी भाजपचा नेताच सर्वांना भडकावतोय''

सकाळ वृत्तसेवा

सांगली : वैयक्तिक व्यवहारातून वैयक्तिक संबंध बिघडत असतात, त्यात पक्षाचा काही संबंध नसतो. अन्य पक्षात जाण्याविषयी सदस्यांना कोण भडकावत आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपमध्ये BJP)राहून असे नेते विरोधकांच्या सोयीची भूमिका घेत आहेत, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (prithviraj deshmukh) यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.(bgp-district-president-prithviraj-deshmukh-criticism-mp-sanjay-patil-political-marathi-news)

जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी जिल्हाध्यक्षांबरोबरच्या वैयक्तिक वादातून पक्ष सोडल्याचे मत खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. त्यावर खुलासा करताना देशमुख यांनी प्रतिहल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की भाजप हा कोणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही. या पक्षात सामूहिक नेतृत्व चालते. कोणताही निर्णय कोअर समिती घेत असते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा निर्णयसुद्धा कोअर समिती घेईल.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे एबी फॉर्म अधिकृत उमेदवारांना कोणी दिले नाहीत? निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीवेळी श्रेष्ठींचा आदेश डावलण्याचा प्रयत्न कोणी केला? याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठांना कोअर समितीने पाठविला आहे. महापालिका निवडणुकीतही वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न याच मंडळींनी केला.

प्रत्येक निवडणुकीत भाजपमध्ये राहून विरोधकांच्या सोयीची भूमिका कोण घेत आहे, हे सर्वांना माहीत आहे. विरोधकांना हवीशी भूमिका घेऊन स्वार्थ साधण्याचे काम ते करीत आहेत. भाजपच्या सदस्यांना पक्षाच्या विरोधात भडकविण्याचे काम कोण करीत आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पलूस-कडेगाव मतदारसंघातही असा प्रयत्न सातत्याने सुरू असतो, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT