Bhakti Wadkar Selected For Khelo India Competition  
पश्चिम महाराष्ट्र

हमाल करतोय मुलीच्या स्वप्नावर सगळा पगार खर्च

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक ( कोल्हापूर) - येथील भक्ती ऊर्फ जिजाऊ राहुल वाडकर या जलतरणपटूची जानेवारीत होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अर्थातच, ही कोल्हापूरकरांना गौरवाची गोष्ट असली तरी या निवडीचा सर्वांत मोठा आनंद झाला आहे, तो हमाल व्यवसाय करणाऱ्या तिच्या वडिलांना. वडील एकीकडे हमाली व्यवसायातून घाम गाळत आहेत आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगी दुसरीकडे पाण्यात घाम जिरवतेय. बाप - लेकीच्या या जिद्दी प्रवासाला आता पंख फुटू लागले आहेत.

राहुल वाडकर हे सध्या राधानगरी येथील महसूल कार्यालयाच्या शासकीय गोदामांमध्ये हमाल व्यवसाय करीत आहेत. लहानपणापासूनच त्यांना जलतरणपटू होण्याची आवड होती. परंतु परिस्थितीने त्यांचे हे स्वप्न अपुरे राहिले. 

पुणे येथे घेत आहे प्रशिक्षण

पहिली मुलगी झाली आणि पहिल्या बारा दिवसातच तिला पाण्यात सोडून जलपरी करायचे स्वप्न उराशी बाळगले. आपले अधुरे स्वप्न या पोरी कडूनच पूर्ण करून घेणार या जिद्दीला पेटलेले वडील  तिच्यासाठी आता शासकीय गोदामात कष्ट उपसत आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंधरा वर्षाची पोर आपला घाम पाण्यात मुरवू लागली आहे. भक्ती गेल्याच महिन्यात झालेल्या दिल्ली येथील राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये यशस्वी ठरली. 
देशातून निवडलेल्या आठ जलतरणपटूंमध्ये भक्ती पाचव्या क्रमांकावर निवडली गेली. १७ वर्षाखालील गटांमध्ये ती आता ‘खेलो इंडिया’साठी खेळणार आहे. सध्या ती पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा पिठात जलतरणपटू होण्यासाठी धडे घेत आहे. राष्ट्रीय किर्तीचे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धतला एक एक सेकंद कसा कमी होईल यासाठी जिद्दीने कष्ट उपसत आहे. 

पोरीच्या स्वप्नासाठी खर्च केला पगार

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वडीलांची भंगलेले स्वप्न तिच्याही वाट्याला येऊ नयेत म्हणून राहुल रात्रीचे दिवस करत आहेत. तोकड्या जमिनीवर घरसंसार चालवायचा आणि हमालीतून मिळणारा पगार पोरीच्या स्वप्नावर खर्च करायचा हा नित्यनियम वाडकर कुटुंबाचा आहे. आजवरच्या या प्रवासात भक्तीला कोल्हापुर महिला बालकल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ, मजूर व हमाल संस्थेचे अध्यक्ष सी. बी. पाटील आणि राशिवडे येथील नागेश्‍वर हायस्कूल संकुलचे सहकार्य लाभले आहे. वडीलांनी आभाळाएवढी पाहिलेली स्वप्नं आणि मुलीची आभाळाला गवसणी घालण्याची जिद्द याला निश्‍चितच सलाम करावा लागेल.

गरज आर्थिक बळ देण्याची...

राहुल हे हमाली व्यवसाय करून पोटाला चिमटा देऊन कष्टाचे मिळविलेले पैसे लेकीला जलपरी करण्यासाठी खर्च करीत आहेत. मात्र, यापुढचा प्रवास त्यांना झेपणारा नाही. आता समाजसेवी संस्था, व्यक्तींनी पुढे येऊन भक्तीला आर्थिक बळ देण्याची गरज आहे, तरच कोल्हापूरची ही चिमुरडी पोर आंतरराष्ट्रीय कीर्तीची जलपरी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT