mohol
mohol 
पश्चिम महाराष्ट्र

भिमा कारखाना दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार : खा. धनंजय महाडिक

राजकुमार शहा

मोहोळ : चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे, सध्या दुष्काळाचे सावट आहे, मात्र उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे, चालू गळीत हंगामात भिमा कारखाना दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार असून कुठल्याही इतर कारखान्यांच्या प्रलोभनास बळी न पडता सर्व ऊस भिमालाच गाळपासाठी द्यावा असे सांगत, हुमणी बाधित ऊसाला गाळपासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांनी केले. 

टाकळी सिकंदर (ता .मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याचा सन 2018/19 या गळीत हंगामाचा 39 वा जुन्या व नव्या प्रकल्पाचा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा खा महाडिक व त्यांच्या पत्नी अरूंधती महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी खा. महाडिक बोलत होते. कारखान्याचे माजी संचालक सुरेश शिवपुजे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर श्रीधर बिरजे, उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक अशोक पाटील, भारत पाटील, बाबा जाधव, संजय यादव, राजु बाबर, संग्राम चव्हाण, राजेश पवार, माणिक बाबर, झाकीर मुलाणी, पांडुरंग ताटे, सुनील चव्हाण, उपसभापती साधना देशमुख, संचालक सर्व खातेप्रमुख त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.

खा. महाडिक पुढे म्हणाले साखरेचे दर कमी झाल्याने व बँकाना मर्यादा आल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत, संपूर्ण देशातील कारखान्यांची वीस हजार कोटीची एफआरपी थकली होती, अद्यापही 54 कारखान्यांनी एफआरपी दिली नाही. भिमाने टर्बाईन, बॉयलर व मिल ही  कारखान्यातील महत्वाची यंत्रसामुग्री नवीन तंत्रज्ञानानुसार बसविली आहे. त्यामुळे कारखाना दररोज पाच हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार आहे, मात्र कामगारांना जरा कसरत करावी लागणार आहे.

शासनाने वीस लाख मेट्रीक टन साखरेचा निर्यातीचा कोटा जाहिर केला होता, मात्र बाहेर देशातील साखरेच्या दरात व आपल्याकडील साखरेच्या दरात, प्रती किलो नऊ रुपयाचा फरक असल्याने केवळ साडेतीन लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली आहे. सूत्रसंचलन माऊली जाधव यांनी करून आभार सतीश जगताप यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT