bhose
bhose 
पश्चिम महाराष्ट्र

भोसे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा

गुरुदेव स्वामी

भोसे - पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून आमदार भारत भालके, स्वाभीमानी शेतकरी संघटना शिवसेनेही मागणी केली. दरम्यान, जिल्हाधीकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी तालुक्यातील पिकाची पाहणी केली असली तरी त्यांच्या शासनास सादर होणाऱ्या अहवालबरोबर अडचणीतील शेतकऱ्यांना मदत कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात यंदा पावसाळा संपत आला तरी एकही समाधानकारक पाऊस न झालेने तालुक्यात असणारे मध्यम प्रकल्प अजून कोरडे आहेत. खरिप पिकाच्या दक्षिण भागातील पिकाची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी सलग दुसर्‍या वर्षी अडचणीत सापडला आहे. 

शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने नायब तहसीलदार गणेश लव्हे यांनाही निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, तालुका कृषी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड, प्रशांत काटे आदी उपस्थित होते. 

भोसे, जुनोनी, खुपसंगी, या गावातील पिकाची पाहणी केली. यामध्ये बाजरी, सुर्यफुल, तूर, मुग, मका ही खरीप पीके तर हातातून गेलेच आहे. निदान शासनाकडून काही मदत मिळेल का याकडे तालुक्यातील बळीराजा डोळे लावून बसला आहे.

दरम्यान, शेवटी मंगळवेढा येथे अधिकार्‍यांची बैठक घेऊन या बैठकीत मंगळवेढा तालुक्यात यंदा फक्त 37%पाऊस झाला असून, दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी बिनचूक माहिती अधिकार्‍यांनी द्यावी तसा अहवाल शासनाकडे पाठवणार असलेचे असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT