sangali
sangali 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिकेचा वर्धापनदिन उत्साहात

सकाळवृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग अटेंडन्सचे उद्‌घाटन झाले.
महापालिकेचा 21 वा वर्धापन दिनाचा प्रारंभ आज सकाळी आयर्विन पुलावर
नागरिकांना गुलाब पुष्प देवून करण्यात आला. यावेळी महापौर संगीता खोत,
आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपमहापौर धिरज सुर्यवंशी, स्थायी समिती सभापती
अजिंक्‍य पाटील, नगरसेवक शेखर इनामदार यांनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी निर्माल्य नदी पात्रात टाकू नका अशी
विनंती केली.

फेसरिडींग अटेंडन्सचे उद्‌घाटन महापालिका मुख्यालयात महापौर सौ. संगीता खोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच फेसरीडिंग अटेंडन्स सिस्टीमचे उदघाटन झाले. राजाभाऊ जगदाळे सभागृहात महापौर आणि आयुक्त यांचे हस्ते केक कापून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर मुख्यालयात पदाधिकारी, अधिकारी यांच्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

लोकशाही पंधरवडा अंतर्गत डॉ. नामदेव कस्तुरे यांचे "लोकशाही आणि सुशासन' विषयी व्याख्यान झाले. लोकशाहीसाठी मतदान करणे अंत्यत आवश्‍यक आहे. लोकांनी मतदान करणे आणि मतदान करण्यास जागृती करणे आवश्‍यक असल्याचे मत डॉ. कस्तुरे यांनी व्यक्त केले. या वेळी नगरसेविका भारती दिगडे, विष्णू माने, उप आयुक्त मौसमी चौगुले बर्डे, विविध विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

महापौर, आयुक्तांचा नेत्रदानाचा संकल्प
डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात अवयव दान विषयी डॉ. सुनील कुरणे यांचे
व्याख्यान झाले. एका व्यक्तीने अवयव दान केले तर त्यापासून आठ व्यक्तीना
जीवदान देणे शक्‍य आहे. संमती शिवाय अवयव दान करता येत नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर संगीता खोत आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.

महापालिका चकाचक वर्धापन दिनानिमित्त आज महापालिका चकाचक स्वच्छ करण्यात आली होती. प्रवेशदारात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आकर्षक रांगोळी काढली होती. दारात सनई वादनाची ध्वनीफित लावून वातावरण प्रसन्न केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT