bjp-rpi
bjp-rpi 
पश्चिम महाराष्ट्र

आरपीआय भाजपसोबतच 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. आज झालेल्या चर्चेत आरपीआयला दोन जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे चार मतदारसंघ सोडण्याचा निर्णय झाला. आरपीआयने आणखी चार जिल्हा परिषद व प्रत्येक तालुक्‍यातील एक पंचायत समितीची जागा मागितली आहे; मात्र जागावाटपावरून आघाडीमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे आरपीआयचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी सांगितले. 

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्‍ती व आरपीआच्या नेत्यांशी चर्चा केली. या वेळी आरपीआयने भाजपसोबत राहण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आज जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत पहिल्या टप्प्यात आरपीआयला सांगरूळ (ता. करवीर) व सरवडे (ता. राधानगरी) हे जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ व चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी (ता. भुदरगड) व भादवण (आजरा) हे पंचायत समितीचे चार गण देण्याचा निर्णय झाला. याशिवाय आरपीआयने उचगाव गटाचीही मागणी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतून बाहेर पडल्यामुळे उदगाव (ता. शिरोळ), किणी (ता. हातकणंगले) व परिते (ता. करवीर) या जिल्हा परिषद मतदारसंघांची मागणी केली आहे. याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT