bjp
bjp 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : भाजपचा माढ्याचा तिढा अखेर सुटला

सकाळवृत्तसेवा

पुणेः भारतीय जनता पक्षाचा माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून, पक्षाने आज (शुक्रवार) फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीची राजकीय पातळीवर धामधूम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीकडून 'स्वाभिमानीच्या'वतीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत मैदानात उतरले होते. पण यंदा सदाभाऊ बाहेर पडल्याने आणि स्वाभिमानीचे घोडे हातकणगंलेवरच अडल्याने अन्य ठिकाणी स्पष्टता नाही. बळिराजा शेतकरी संघटनेने फक्त निर्णय घेतला आहे. तर, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना आणि रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटना यात कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना या निवडणुकीपासून दूर पडल्याचे चित्र आहे.

माढा मतदार संघामधून भाजपचा उमेदवार कोण असणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. वेगवेगळ्या उमेदवारांची नावे पुढे येत होती. भाजने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यामुळे चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

जिल्ह्यात सोलापूर आणि माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. सोलापूरच्या तुलनेत माढा मतदारसंघात बहुसंख्येने ग्रामीण भाग अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघावर पहिल्यापासूनच राजकीय पक्षांचे लक्ष आहे. गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे. पहिल्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इथून निवडणूक लढवली. त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढवली. दोन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. गतवेळच्या निवडणुकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीकडून मोहिते पाटील यांना लढत दिली. त्या वेळी पहिल्यांदाच शेतकरी संघटनेला महत्त्व आले. पण यंदाच्या निवडणुकीत मात्र महायुती किंवा महाआघाडी यांच्याकडून शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांना फारशी दखल न घेतल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

Pushpa 2: 'पुष्पा-2'मध्ये समंथा नाही तर 'ही' अभिनेत्री करणार आयटम साँगवर डान्स? चर्चांना उधाण

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले, 4 जणांचा मृत्यू

Indapur Crime News : इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञाताने केला हल्ला

Latest Marathi News Live Update: पुणे पोर्श प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास सुरु: पुणे पोलीस आयुक्त

SCROLL FOR NEXT