BJP has control over Sangli Municipal Corporation administration
BJP has control over Sangli Municipal Corporation administration 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिका कारभारावर, प्रशासनावर भाजपचेच नियंत्रण

अजित झळके

सांगली : महापालिकेवर पहिल्यांदाच "ब्रॅंडेड भाजप'ची सत्ता आली असून नागरिकांनी दाखवलेला विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू. इथल्या कारभारावर आणि प्रशासनावर भाजपचेच नियंत्रण आहे आणि असेल असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. 

सात कोटींच्या विकास कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी तसेच मिरजेतील ट्रिमिक्‍स रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, सभापती पांडुरंग कोरे, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी, गटनेते युवराज बावडेकर, आयुक्त नितीन कापडणीस आदी यावेळी उपस्थित होते. 

महापौर गीता सुतार यांनी जयंत पाटील यांना "डोक्‍यावर हात असू द्या', असे आवाहन केले होते, जयंतरावांनी त्यावर "इनामदार, देशपांडे यांच्यावर माझे प्रेम आहे', असे सांगत त्यांच्या उपस्थितीत महापालिकेत येऊ, अशी ग्वाही दिली होती. त्यावर इनामदारांनी जयंतरावांसाठी आवतन दिले. या साऱ्याचा अर्थ पुन्हा बीजेपीची वाटचाल "जेजीपी'कडे चालली आहे का, या प्रश्‍नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "" निवडणूका पंधरा दिवसांच्या आहेत. त्यानंतर विकासासाठी साऱ्यांनी एकत्र यावे, हेच अपेक्षित असते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, जयंत पाटील पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे काही चुकीचे नाही.'' 

ते म्हणाले, ""महापालिकेवर भाजपचेच नियंत्रण आहे. तेथे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे पूर्ण लक्ष आहे आणि त्यांच्या कारभारावर आमचे लक्ष आहे. आता राज्यात जे सरकार असेल त्यांच्याशी संवाद साधणे हे अधिकाऱ्यांना गरजेचे असते. त्यामुळे आमचे नियंत्रण नाही, असे म्हणता येणार नाही. अर्थात, आम्ही गाफिल नाही.'' 

ते म्हणाले, "" सत्ता आल्यानंतर आम्ही विकासाचा कसोशीने प्रयत्न करीत आहोत. आज घंटागाड्यांपासून रस्त्यांपर्यंत महत्वाची कामे मार्गी लागत आहेत. कुपवाडचे ड्रेनेज, शिवाजी क्रीडांगणाचा विकास, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशी कित्येक वर्षे रखडलेली कामे पूर्ण होत आहेत. मनपा जिंका आम्ही 100 कोटी रुपये देतो, असे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. ते त्यांनी दिले आणि त्यातून अनेक कामे पूर्ण झाली. आम्ही विश्‍वासाने अपेक्षापुर्ती करत आहोत.'' 

काकांना दिल्लीचा व्याप... 
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्यातील अनुपस्थितीनंतर आज पुन्हा प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात खासदार संजय पाटील हजर नव्हते. असे का या प्रश्‍नाव चंद्रकांत पाटील म्हणाले, "" ते खासदार आहेत, दिल्लीत त्यांच्याकडे काही जबाबदारीची कामे असतात. त्यामुळे ते दिल्लीत जास्त वेळ असावेत.'' 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT