Chandrakant Patil
Chandrakant Patil 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : दारु पिणाऱ्याला कळते मोदीच्या हाती देश सुरक्षित: चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

पंढरपूर : दारु प्यायलेल्या माणसाला कळतं की मोदीच देश सुरक्षित ठेवू शकतात, तर तुम्हाला आम्हाला कसं कळत नाही, असे धक्कादायक विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरात एका सभेत बोलताना केले.

महाराष्ट्रातील काँग्रेस पूर्ण संपवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे. सांगलीला काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार उभा करता आला नाही. ज्या वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र आणि काँग्रेस उभी केली त्याच पाटील घराण्यावर बॅट घेण्याची वेळ यावी हे दुर्दैव, असल्याची टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

पंढपुरात रात्री भाजप-शिवसेनेचा संयुक्त मेळावा झाला. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राष्ट्रवादीने काँग्रेस संपवली असा आरोप केला. मेळाव्याला आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे उमेदवार रणजितसिंह  नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार सुधाकर परिचारक आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT