sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बॅंक निवडणुकीतून भाजपच्या संजयकाका पाटलांची माघार

महाआघाडीचे पॅनेल निश्चित केल्यानंतर भाजपाची यादी उशिरापर्यंत जाहीर झाली नव्हती.

घनशाम नवाथे

महाआघाडीचे पॅनेल निश्चित केल्यानंतर भाजपाची यादी उशिरापर्यंत जाहीर झाली नव्हती.

सांगली - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात लढत निश्चित झाली आहे. भाजपचे खासदार व विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

21 जागांच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. 316 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी आज गर्दी झाली होती. अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले.

सहकार विकास पॅनेल (महाआघाडी) : सोसायटी गट :

आटपाडी - तानाजी पाटील, कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे, खानापूर - अनिल बाबर, पलुस - महेद्र लाड, कडेगाव - मोहनराव कदम, वाळवा - दिलीप पाटील, शिराळा - मानसिंगराव नाईक, मिरज - विशाल पाटील, जत - विक्रम सावंत, तासगाव - बी. एस. पाटील. महिला राखीव - जयश्री मदन पाटील, अनिता विजय सगरे.

अनुसूचित जाती-जमाती - बाळासाहेब होनमोरे, ओबीसी - मन्सुर खतीब, विमुक्त जाती व भटक्या जमाती - राजेंद्र डांगे, इतर सहकारी संस्था - वैभव शिंदे, प्रक्रिया संस्था - सुरेश पाटील, पतसंस्था गट - किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था - हणमंतराव देशमुख, सुनील ताटे. महाआघाडीचे पॅनेल निश्चित केल्यानंतर भाजपाची यादी उशिरापर्यंत जाहीर नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT