babadesai
babadesai 
पश्चिम महाराष्ट्र

'पाच पक्षांचे झेंडे लावणाऱ्यांनी भाजपला नीतिमत्ता शिकवू नये '

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - स्वत:च्या वाहनावर पाच पक्षांचे झेंडे लावून आमदारकी मिळवली. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची प्रचारसभा सासने ग्राउंडवर झाली, त्यावेळी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून स्वत:चा प्रचार करताना नीतिमत्ता कुठे गेली होती? माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गुरू मानून राजकारणाचा श्रीगणेशा केला, त्याच गुरूला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करतो, असे म्हणणारे आमदार सतेज पाटील यांनी भाजपबद्दल वक्तव्य करू नये. सर्वच रंगमंचांवर फिरणाऱ्या या नेत्याने भाजपला नीतिमत्ता शिकवू नये, असे पत्रक भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी दिले आहे. 

श्री. देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे, ""माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी आयारामांना वगळून जिंकून दाखवा, असे म्हटले. परंतु, प्रत्येक माणसाने स्वत:चा भूतकाळ कधीही विसरू नये. कारण याच सतेज पाटलांनी हा प्रश्न स्वत:च्या मनालाच विचारावा. पहिली आमदारकी मिळवताना त्यांनी स्वत:च्या वाहनावर पाच पक्षांचे पाच झेंडे लावले. 

आमदार सतेज पाटलांनी आयआरबी कंपनीची टोलची पावती फाडण्याचा भीम पराक्रम केला. तसेच शहराच्या नागरिकांना शुद्ध पाणी देतो म्हणून थेट पाइपलाईन योजना आणली. परंतु, आज पाइपलाइनच्या कामाची दुरवस्था का आहे? हे प्रसिद्धीस द्यावे. त्यामुळेच त्यांनी प्रथम आत्मक्‍लेश करावा. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पराभवात सतेज पाटलांचा केवढा सिंहाचा वाटा होता, हे तमाम कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे. 

महाराष्ट्राचे जाणते नेतृत्व व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हजारो कोटींचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. मंत्री श्री. पाटील करत असलेल्या कामामुळेच प्रभावित होऊन इतर पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भाजपमध्ये वर्षानुवर्षे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना याही निवडणुकीत संधी दिली जाणार आहे. जिल्ह्यासाठी अमृत योजना, विमानतळ विस्तारीकरण, एलबीटी मुक्ती, महालक्ष्मी व जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंचगंगा घाट सुशोभीकरण व विस्तारीकरण, गडकिल्ले संवर्धन विकास निधी, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे विस्तारीकरण, सोनवडे घाटासाठी विशेष निधी, सीपीआरमधील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी, मेडिकल कॉलेज, शाहू जन्मस्थळ इत्यादी अनेक योजना पूर्णत्वाकडे जात आहेत. 

म्हणूनच बेताल वक्तव्ये 
मंत्री श्री. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते "सबका साथ सबका विकास' या विचारातूनच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. या कामांचा धडाका पाहूनच सतेज पाटलांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे व ते बेताल वक्तव्ये करत सुटले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT