Black market of railway ticket reservation exposed; In one possession, 30 thousand tickets confiscated
Black market of railway ticket reservation exposed; In one possession, 30 thousand tickets confiscated 
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे तिकिट आरक्षणाचा काळाबाजार उघड; एक ताब्यात, 30 हजारांची तिकिटे जप्त

प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) ः रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एकास रेल्वेच्या सतर्कता विभागाने ताब्यात घेतले. महेश बाळकृष्ण लगाडे, असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीस हजार रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. मिरज रेल्वे सुरक्षा बल स्थानकात नोंद झाली आहे. ही कारवाई रेल्वेच्या मुंबईस्थित सतर्कता विभागासह मिरज येथील रेल्वे सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. लॉकडाउननंतर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. 

रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अनेक दिवसांपासून रेल्वेच्या तिकिटांच्या काळ्या बाजाराबाबत रेल्वे प्रशासन कारवाई करीत आहे. मिरज, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूरसह तिकिटांच्या काळ्या बाजाराचे लोण लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणाऱ्या छोट्या रेल्वे स्थानकापर्यंतही पोहोचले आहे.

मध्यंतरी ताकारी येथील एका कर्मचाऱ्यासही सतर्कता विभागाने अटक केली होती. त्यानंतर काही दिवस टोळ्यांच्या हालचाली मंदावल्या. लॉकडाउननंतरही बऱ्यापैकी बंदच झाला होता. 


गेल्या काही दिवसांत रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या, तसे टोळ्यांनी डोके वर काढले. या गाड्यांची तिकिटे खपविण्यासाठी टोळ्या सतर्क झाल्या. काही तिकिटे मुंबई रेल्वे स्थानकात मिळाली. त्यावरून सतर्कता विभागाने पुन्हा मिरज रेल्वे स्थानकाबाहेरील तिकीट विकणाऱ्यांची चौकशी केली. त्यांच्या दुकानांची तपासणीही केली.

संशयित महेश लगाडे याच्या दुकानात एक हजार 960 रुपयांची तिकिटे आणि 29 हजार 846 रुपयांची जुनी तिकिटे मिळाली. कर्मचाऱ्यांनी लगाडेला ताब्यात घेतले आहे. रेल्वे कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे येथील रेल्वेच्या विशेष न्यायालयात उद्या (ता. 26) हजर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT