A blast triggered by a gas in karhad
A blast triggered by a gas in karhad  
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडला गॅसच्या स्फोटाने मध्यवस्ती हादरली 

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : येथील गुरूवार पेठेतील दर्गाह मोहल्ला परिसरातील मध्यवस्ती पहाटे चारच्या सुमारास गॅसच्या स्फोटाने हादरली. येथील पीर मुर्तजा हजरत अली दर्गाह ट्रस्टच्या इमारतीत फरसानाच्या दुकानात स्फोट झाला. त्या स्फोटाने साखर झोपेत असलेले निम्मे शहर हादरले.

त्या ट्रस्टसह फरसान दुकानाच्या साहित्याचे सुमारे तीस लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. हजरत अली ट्रस्टच्या पीर बसवले जातात. त्याच्या साहित्याचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे. दर्गाह मोहल्ला येथे ट्रस्टची इमारत आहे. ती दिवाळीचे साहित्य तयार करण्यासाठी जैन फरसाण यांना दिली होती. कालही तेथे काम सुरू होते. रात्री उशिरा काम संपवून लोक गेली.

मात्र पहाटे चारच्या सुमारास आत असलेल्या गॅसचा जबरदस्त स्फोट झाला. त्यात जैन फरसानचे दहा तर ट्रस्टच्या इमारतीसह पीराच्या साहित्याचे वीस लाखांचे नुकसान झाले. जोराचा आवाज झाल्याने शहरातील नागरीक धावत तेथे पोचले पहाटे पासून मदत कार्य राबविले गेल. अग्नीश्यामक दलाच्या जवानांच्या मदतीने स्थानिक नागरीकांनी मदत कार्य राबविण्यात आले. त्यावेळी दोन तासाने आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यत आगीने सुमारे तीस लाखांचे नुकसान केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT