Bndhara Renewal Issue In Kamewadi
Bndhara Renewal Issue In Kamewadi 
पश्चिम महाराष्ट्र

बंधाऱ्याची डागडुजी पाच महिन्यांपासून रखडलेलीच

अशोक पाटील

कोवाड : कामेवाडी (ता. चंदगड) येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा मातीचा भराव पाच महिन्यापूर्वी अतिवृष्टीच्या काळात तुटून गेला होता. पूर ओसरल्यानंतर वाहतूक बंद झाली होती. स्थानिक लोकांनी मातीचा भराव केल्यानंतर तात्पूरती वाहतूक सुरू झाली. अद्याप एसटी वाहतूक सुरू नाही. बंधाऱ्याची अशी स्थिती असतानाही प्रशासन त्याची दखल घेत नाही. धोकादायक अवस्थेत बंधाऱ्यावरुन वाहनांची ये-जा सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी तुटलेल्या रस्त्याचे काम झाले नाही तर सुरू असलेली वाहतूकही या मार्गावरची बंद होणार आहे. 

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूरात कामेवाडी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता तुटला होता. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने कामेवाडी गावाकडील बाजूचा बंधाऱ्याचा रस्ता 25 फुट अंतरापर्यंत तुटून वाहून गेला होता. त्यामुळे बंधाऱ्यावरुन वाहतूक बंद झाली होती. रस्त्याचे काम तात्काळ व्हावे म्हणून लोकानी प्रशासनाकडे जोर लावला. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकानी निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर स्थानिक लोकांनी मातीचा भराव टाकून तात्पूरती वाहतूक सुरू केली. डिसेंबरनंतर त्याच रस्त्यावरुन उसाची वाहतूक करणारी वाहनेही ये-जा करत आहेत.

बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता मातीचा आहे. बंधाऱ्याजवळ रस्त्याला बाजूपट्ट्या नाहीत. धोकादायक स्थितीत सध्या ही वाहतूक सुरू आहे. त्यामुळे एसटी वाहतूक अद्याप सुरू केलेले नाही. जानेवारी महिनाही संपत आला. तरीही रस्त्याच्या कामाबाबत हालचाली दिसत नाहीत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर पुन्हा यावर्षी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा मातीचा भराव तुटून जाण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. तसे झाले तर बंधाऱ्याला धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन रस्त्याच्या बांधकामाबाबत हालचाली कराव्यात अशी मागणी होत आहे. 

आमदारांनी पाहणी करावी 
कामेवाडी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता पुरात तुटून गेला होता. त्यामुळे तात्काळ रस्त्याचे काम करणे अपेक्षीत होते, पण प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. त्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी बंधाऱ्याची पाहणी करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. 

वाहतूक धोकादायक

सध्या कामेवाडी बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम तात्काळ झाले पाहिजे. प्रशासन येथे दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का,असा प्रश्‍न पडतो आहे. 
- अजित पाटील, कोवाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT