The body of a fishing boy was found
The body of a fishing boy was found 
पश्चिम महाराष्ट्र

माश्‍या ऐवजी मच्छिमार लागला गळाला 

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : मुळा धरणाच्या जलफुगवट्यात (बॅक वॉटर) मासेमारी करताना काल (शनिवारी) फिट (मिरगी) आल्याने बुडालेल्या आदिवासी तरुणाचा मृतदेह तब्बल 25 तासांच्या शोधमोहिमेनंतर आज दुपारी साडेबारा वाजता सापडला. नानासाहेब रघुनाथ जाधव (वय 35, रा. चिपाची ठाकरवाडी, चिंचाळे) असे मृताचे नाव आहे. 

मासेमारीसाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी ट्रकच्या ट्यूबच्या साह्याने काल (शनिवारी) सकाळी नानासाहेब पाण्यात उतरला होता. तो पट्टीचा पोहणारा होता; परंतु त्याला अधूनमधून फिट (मिरगी) येत असे. जाळे काढतानाच त्याला पाण्यात अचानक फिट आली नि धरणाच्या अथांग पाण्यात बुडाला. सकाळी साडेनऊपर्यंत घरी परतण्याचा त्याचा नित्यक्रम होता; परंतु साडेदहा वाजेपर्यंत तो न परतल्याने वडील रघुनाथ जाधव व बंधू घमा जाधव धरणावर गेले. तेथे त्यांना नानासाहेबाचे कपडे व चप्पल दिसली. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही तो दिसला नाही.

अखेर त्यांनी सकाळी अकरा वाजता मासेमारी करणाऱ्या स्थानिक तरुणांच्या मदतीने धरणात त्याचा शोध सुरू केला. मात्र, सायंकाळी चार वाजेपर्यंत शोध न लागल्याने, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब वडितके यांनी राहुरी पोलिसांना खबर केली. सायंकाळी सात वाजता अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. 

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेवरून आज सकाळी सात वाजता प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. नगर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे पथक, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, मंत्री तनपुरे यांचे स्वीय सहायक विजय टापरे, तलाठी भाऊसाहेब थोरात, रामदास बाचकर, प्रभाकर गाडे, शिवाजी केदारी आदींनी शोधकार्यात भाग घेतला. 

मासेमारी करणाऱ्या लाकडी सहा होड्या, वावरथ-जांभळीची एका यांत्रिक बोटीमधून शोध सुरू होता. पाच-सहा किलोमीटरच्या अथांग जलसागरात खोल पाण्यात त्यास शोधणे कठीण होते. अखेर नानासाहेब याने मासेमारीचे जाळे पसरविलेल्या ठिकाणी लाकडी होड्या व लॉंचने रिंगण करण्यात आले. पाचशे फूट खोल पाण्यात गळ टाकून, शोधकार्य सुरू झाले. तब्बल 25 तासांनंतर दुपारी साडेबारा वाजता मृतदेह गळाला लागला. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. 

मुळा धरणाच्या सहा-सात किलोमीटर पसरलेल्या अथांग पाण्यात शोध घेणे कठीण होते. मृतदेह पाण्याच्या तळाशी होता. फुगून वर येण्यास त्यास दोन-तीन दिवस लागले असते. कपडे गळाला अडकल्याने, पाचशे फूट खोल पाण्यातून मृतदेह काढणे शक्‍य झाले. 
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT