chandrahar patil.JPG
chandrahar patil.JPG 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील गजाआड

सकाळवृत्तसेवा

 विटा-वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा, या कारणावरून तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना मारहाण करणा-या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला आज दुपारी चारच्या सुमारास "एलसीबी' च्या पोलिस पथकाने दिघंची (ता. आटपाडी) येथील हॉटेल अथर्व समोर सापळा रचून पकडले. तसेच त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे (वय 19,रा. कंडारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) याला देखील अटक केली.

पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी ही माहिती दिली. 
तीन मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास चंद्रहार पाटील आणि साथीदार सागर सुरवसे याने तहसीलदार श्री. शेळके यांना वाळूच्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा रोष मनात ठेवून व वाहनांना केलेला दंड रद्द करून वाहने सोडावीत यासाठी तहसील कार्यालयाच्या पोर्चमध्ये श्री. शेळके त्यांच्या शासकीय गाडीत बसत असताना अडवले. त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर चंद्रहार पाटील व सागर पळून गेले. त्यांच्या शोधासाठी तीन पथके कार्यरत केली होती. ते दोघे पसार झाल्यापासून त्यांचा पथके शोध घेत होती. पोलिसांनी क-हाड, सुर्ली, आटके, तासगांव, कुंडल व भाळवणी व परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. 

आटपाडी तालुक्‍यातील दिघंची येथे चंद्रहार येणार असल्याची माहिती "एलसीबी' च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आज दुपारी चारच्या सुमारास हॉटेल अथर्वसमोर त्यास पकडण्यात आले. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, प्रदीप चौधरी आणि पथकाने कामगिरी केली. 
चंद्रहारला अटक करावी, यासाठी जिल्ह्यातील महसूलच्या अधिका-यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना त्याचे निवेदन देण्यात आले होते. अखेर पंधरा दिवसांनी चंद्रहारला अटक करण्यात पोलिसांना यश आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT