city lock.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : पोलिसांनी निम्मी सांगली केली "लॉक'...कशासाठी? वाचा  

सकाळवृत्तसेवा

सांगली-"कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी आता सांगली शहरातील खणभाग, गावभाग, संजयनगर, शामरावनगर आदी दाट लोकवस्तीचा भाग आज सकाळपासून पूर्णपणे "लॉक' करण्यात आला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांपासून संसर्ग पसरू शकतो हा धोका लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज निम्मी सांगली "लॉक' झाली आहे. 


"कोरोना' मुळे 3 मे पर्यंत "लॉक डाऊन' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अत्यावश्‍यक सेवा वगळता संचारबंदी करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या हुल्लडबाज तरूणांविरूद्ध जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांनी मोहिम उघडली आहे. आतापर्यंत हजारो दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. तरी देखील अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. पोलिसांनी अडवले तर खोटी कारणे देऊन सुटका करून घेतात. 


रस्त्यावर विनाकारण होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस आता अधिक आक्रमक झाले आहेत. आज सकाळपासून खणभागातील सर्व गल्ल्यांत प्रवेश होणारी ठिकाणी बॅरिकेटस्‌ लावून बंद करण्यात आली आहे. दुपारपर्यंत संपूर्ण खणभाग "लॉक' करण्यात आला. तत्पूर्वी गावभागातील सर्व रस्ते बॅरिकेटस्‌ आणि बांबूच्या चिवाट्या लावून बंद करण्यात आले. तसेच संजयनगर, मंगळवार बाजार परिसर दुपारपर्यंत "सील' करण्यात आला होता. शामरावनगर, हनुमाननगर, नवीन वसाहत आदी परिसर देखील लॉक करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. 
पोलिसांनी अचानकपणे परिसर "लॉक' करण्याची मोहिम सुरू केल्यानंतर संबंधित परिसरात उलटसुलट चर्चा रंगली होती. परंतू कोरोना चा प्रसार रोखला जावा यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात आले. कोणीही अफवांवर विश्‍वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे. विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या या मोहिमेतून आज निम्मी सांगली "लॉक' झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे परिसरातील लाखो वाहने गल्ली बोळांमध्ये अडकून पडल्याचे चित्र दिसले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT