पश्चिम महाराष्ट्र

भाऊबीजेसाठी भाऊ आला 17 किमी धावत

राजेंद्र वाघ

कोरेगाव : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसदादाने आज सकाळी तब्बल 17 किलोमीटर अंतर धावत जाऊन वयाची सत्तरी गाठत आलेल्या बहिणीचे घर गाठले. घामाघूम झालेल्या भावाला दारात पाहून प्रारंभी बहिण काळजीत पडली; परंतु भाऊबीज घेऊन आल्याचे भावाने सांगताच दोघा भावंडांनी गळाभेट घेतली. भाऊबीजेसाठी धावत आलेल्या भावाला पाहून बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

कोरेगाव पोलिस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत असलेले वसंतराव साबळे यांचे मूळ गाव वडूथ (ता. सातारा) असून, सध्या ते सातारा येथे वास्तव्यास आहेत. धावणे, पोहणे, कबड्डी, शुटींग हॉलीबॉल, अशा खेळांची आवड जोपासत ते विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सतत भाग घेतात. आजवर त्यांनी गोवा, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, पाचगणी, पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणच्या धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला असून, त्यापैकी कोल्हापूर, मुंबई, सातारा, कऱ्हाड, पाचगणीमधील स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

नुकत्याच गोंदिया येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यांचा सहभाग असलेल्या शुटिंग, व्हॉलीबॉलच्या सातारा जिल्हा संघाने राज्यस्तरावरील स्पर्धेतही चुणूक दाखवली होती. अरबी समुद्रातील मालवण येथील चावला बीच येथे होत असलेल्या पाच किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेत ते गेली चार वर्षे सलग भाग घेत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असूनही त्यांचा ‘फिटनेस’ युवकांना लाजवेल असा आहे. दरम्यान, आज भाऊबीजेच्या पार्श्‍वभूमीवर साबळे यांनी सकाळीच नेहमीप्रमाणे सरावासाठी ‘रनिंग’चा पेहराव केला. आज मात्र त्यांनी काही साहित्य भरलेली सॅक पाठीवर घेऊन सकाळी साडेसहाला साताऱ्यातील घर सोडले आणि रनिंग सुरु केले. त्यांनी तब्बल 17 किलोमीटरचे अंतर एक तास 40 मिनिटांमध्ये धावत कापले आणि आठ वाजून दहा मिनिटांनी ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील बहिण शारदा नवलू सावंत यांचे घर गाठले.

घामाघूम झालेल्या भावाला दारात पाहून प्रारंभी बहिण शारदा काळजीत पडल्या खऱ्या; परंतु भाऊबीज घेऊन आल्याचे भावाने सांगताच दोघा भावंडांनी गळाभेट घेतली. भाऊबीज दिल्यानंतर ते कोरेगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाले. भाऊबीजेनिमित्तच्या त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी कौतुक केले.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT