पश्चिम महाराष्ट्र

विटा : देवनगर येथे बस उलटून ३८ विद्यार्थी जखमी 

सकाळ वृत्तसेवा

विटा - देवनगर ( ता. खानापूर ) येथे छोट्या टेम्पोला रस्ता देत असताना विटा आगाराची बस उलटली. त्यात दहा ते बारा वर्षांची शालेय ३८ मुले - मुली जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. सर्व विद्यार्थ्यांना विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेनंतर टेम्पो चालक मात्र पसार झाला. 

विटा आगाराची विटा - वाळूंज बस (एम.एच.१२,सी. एच. ७५८३) घेऊन चालक वाळूजला निघाले होते. या बसमधून भांबर्डे, देवनगरची मुले - मुली वाळूज ( ता. खानापूर ) येथे न्यू इंग्लीश स्कूलमध्ये शाळेला निघाली होती. देवनगरचे रस्त्याचे वळण ओलांडून बस पुढे जात असताना समोरून छोटा टेम्पो आला. त्यास बाजू देत असताना बस रस्त्यावरून घसरली व बाजूली उलटली. त्यात ही सर्व मुले किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांना तेथील नागरीकांनी तातडीने खासगी वाहने व बसने उपचारासाठी विटा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

दैव बलवत्तर म्हणून मुले वाचली 
बस उलटली त्याठिकाणी तीन फूटावर विहीर आहे. मात्र झाडामुळे बस विहीरीपासून काही अंतरावरच उलटली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT