Shrushti Kulkarni
Shrushti Kulkarni Sakal
पश्चिम महाराष्ट्र

फिरूनी नवी जन्मली ‘सृष्टी’; सकारात्मकतेने कर्करोगावर मात

डॉ. अजित कुलकर्णी

कर्करोग म्हटले की आयुष्य काळवंडून जाते. पण न डगमगता, न खचता सकारात्मक विचाराने व उपचाराने त्यावर मात करण्याची ऊर्मी ठेवल्यास त्यातून पूर्ण बरे होण्याची किमया केलीय सांगलीच्या सृष्टी कुलकर्णी हिने.

सांगली - कर्करोग (Cancer) म्हटले की आयुष्य काळवंडून जाते. पण न डगमगता, न खचता सकारात्मक विचाराने व उपचाराने त्यावर मात करण्याची ऊर्मी ठेवल्यास त्यातून पूर्ण बरे होण्याची किमया केलीय सांगलीच्या सृष्टी कुलकर्णी (Shrushti Kulkarni) हिने. गव्हर्न्मेंट कॉलनीत राहणाऱ्या या मध्यमवर्गीय कुटुंबाने गेली पाच वर्षे अक्षरशः जीव मुठीत धरून कर्करोगाचा सामना करून त्याला मात दिलीय. व्याधीशी लढताना मुंबई विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात सृष्टीने सुवर्णपदक पटकावून एक अनोखा पराक्रमही केला आहे. खडतर तसेच आव्हानात्मक असणारा हा संघर्षमय प्रवास तिने ‘सकाळ’शी बोलताना उलगडला.

विलिंग्डन महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सृष्टी पनवेलला आजीकडे गेली. २०१६ मध्ये बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षाला असताना परीक्षेदरम्यान चक्कर येणे, रक्तस्राव, पायावर डाग दिसल्याने सांगलीत डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला. तेव्हा सृष्टीला रक्ताच्या कर्करोग झाल्याचे निदान झाले, अन् सारेच हादरले. भविष्य अंधःकारमय झाले. उपचारासाठी चांगल्या डॉक्टरांचा शोध सुरू झाला. तब्येत क्षीण होत होती. प्लेटलेटस् व रक्त चढवून तिला मुंबईला उपचारासाठी नेण्‍यात आले. डॉ. मोहन अगरवाल यांच्याकडे तिचे उपचार सुरू झाले. लाखो रुपयांचा चुराडा होत होता. २०१७ मध्ये तिला वर्षभर उपचारासाठी घरीच थांबावे लागले. मात्र स्वस्थ बसणे तिच्या स्वभावात नव्हते. जापनीज भाषा शिकण्यासाठी तिची धडपड सुरू होती. नेहा खरे यांनी घरी येऊन तिला जापनीज शिकवले.

दरम्यान, सततच्या केमोथेरपीच्या उपचारांचा दुष्परिणाम डोळ्यांवर झाला. डिप्लोफिया नावाचा विकार जडला. तिच्या डोळ्याला वस्तू, अक्षर वा पदार्थ दोन-दोन दिसू लागले. मात्र त्यातूनही योग्य सल्‍ल्याने ती सावरत असतानाच पुन्हा एकवार केमोथेरपीच्या दुष्परिणामाने तिच्या उजव्या खुब्याची झीज झाली. तो बदलण्याची अवघड शस्‍त्रक्रिया करावी लागली.

जवळचे सगळे पैसे संपल्यावर कुटुंबीय हतबल बनले. मात्र या कठीण समयी अनेकांनी माणुसकी दाखवून उपचारासाठी केलेल्या मदतीने कुटुंबीय सावरले. केमोथेरपी व इतर उपचार सुरू असतानाच तिने एक वर्षाच्या खंडानंतर बीएस्सीच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतला. सततच्या उपचाराने तिचा चेहरा विद्रूप बनला, डोक्यावरचे सर्व केस गेले. मात्र, या गोष्टींची तमा न बाळगता ती महाविद्यालयात जाऊ लागली. एकीकडे तीव्र वेदनादायी उपचार व दुसरीकडे कठीण अभ्यासाचे शिवधनुष्य पेलत तिने परीक्षा दिली. निकाल लागला अन् मुंबई विद्यापीठात ती पहिली आली. पाठोपाठ ॲनालिटिकल केमिस्ट्री या विषयात एमएस्सीच्या परीक्षेतही सुवर्णपदक मिळवले. उपचार सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी ती दंतरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. अवधूत दीक्षित यांची अर्धांगिनी बनली आहे.

आई प्राची, वडील यशवंत व प्रामुख्याने आजी मंगला यांनी रोगाविरुद्ध लढण्याची उत्तेजना दिली. संकटाची मालिका सुरू असताना संघर्ष करून यश मिळवण्यासाठी बळ दिले. लेखन, वाचन यात मन गुंतवल्याने सकारात्मक राहण्यास मदत झाली. मानसिक स्थिती भक्कम ठेवल्यास कर्करोग पूर्ण बरा होतो. रुग्णांनी घाबरुन न जाता रोगापासून लांब जाण्यासाठी अन्य गोष्टीत मन गुंतवावे.

- सृष्टी कुलकर्णी, सुवर्णपदक विजेती, मुंबई विद्यापीठ.

आजारपणात साकारला ‘कॅलिडोस्कोप’

आजी व आई दोन्ही सिद्धहस्त लेखिका असलेल्या घरात सृष्टीवर साहित्य, वाचनाचे संस्कार नकळत झाले. कर्करोगाशी दोन हात करताना ती उपचारासाठी वर्षभर घरीच होती. त्यादरम्यान आजीने तिला लेखनासाठी मार्गदर्शन केले. हातात पेनही धरण्याचे त्राण नसताना तिने इच्छाशक्तीच्या बळावर लेखन सुरू केले. बघता बघता १९ कथांचा संग्रह तयार झाला. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. अगरवाल यांनीच पुढाकार घेत ‘कॅलिडोस्कोप’ नावाचा कथासंग्रह प्रकाशित करत तिच्या लेखन कौशल्याला आयाम दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT