पश्चिम महाराष्ट्र

सातारा : लाचप्रकरणी फुटका तलाव येथील भुमी अभिलेखचा कर्मचारी सापडला

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जमिनीची अति तातडीची मोजणी करुन जमीनीची हद्द कायम करून देण्याचे मोबदल्यात २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी  गणेश रमेश सपकाळ( राहणार एफ-९ गुरुश्री, अपार्टमेंट, फुटका तलाव, सोमवार पेठ, सातारा, मुळ राहणार पाटेश्वर नगर, पोस्ट बोरगाव, तालूका, जिल्हा. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश हा भुमी अभिलेख कार्यालयात भूकरमापक उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी : तक्रारदार यांचे चुलत भावाच्या जमिनीची अति तातडीची मोजणी करुन जमीनीची हद्द कायम करून देण्यासाठी मोबदल्यात  तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. याबाबतची पडताळणी २७ डिसेंबर २०१९ कालावधीत करण्यात आली. त्यानंतर तीन जानेवारी २०२० या कालावधीत त्यासंबंधी सापळा रचण्यात आला. दरम्यान ध्वनीमुद्रीत संभाषण आणि अन्य बाबींची पुर्तता तसेच खात्री झाल्यानंतर आज (साेमवार) गणेश याच्या विराेधात लाच लुचपत विभागाने सातारा शहर पाेलिसांत गुन्हा नाेंदविला आहे.

ही कारवाई सापळा पथक अशोक शिर्के, पोलीस अधीक्षक, अविनाश जगताप, पोलीस निरीक्षक, श्री. राजे, श्री. काटकर, श्री. खरात, श्री. येवले, मार्गदर्शन अधिकारी राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, पुणे, श्रीमती सुषमा चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, पुणे, तसेच सक्षम अधिकारी उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांच्याद्वारे करण्यात आली.

हेही वाचा : तहसीलदार कार्यालयातील लिपिक ५० हजाराच्या लाचप्रकरणी जाळ्यात

वाचा : सातारा : आरोपी न करण्यासाठी फाैजदार अडकला लाखाेंच्या माेहात

हेही वाचा : दाेन हजार रुपये घेताना पाेलिसाला पकडले

हेही वाचा : आरर...महसूल, पाेलिसांचा असाही विक्रम

वाचा : नगराध्यक्षांना लाचखोरीबद्दल पतीसह अटक


लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. 1064 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह दूरध्वनी 02162-238139 येथे संपर्क साधावा तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता. 

सलमा अल्ला को प्यारी हुई असे म्हणत त्याने दागिने काढून घेतले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Birthday: तुकाराम मुंढेंचा जन्मदिवस! शेतकरी पुत्र ते आयएएसपर्यंतचा प्रवास; प्रामाणिकपणा आणि शिस्तीची कहाणी

Mumbai Pune Expressway: 'मिसिंग लिंक'ने MP च्या मंत्र्यांना केले थक्क! पर्यटन आणि अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्राचा झिरो बजेट फॉर्म्युला वापरणार

US Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पुन्हा टॅरिफ बॉम्ब ! १२.५% अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव, मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बडे नेते पोलिसांच्या ताब्यात

Pune Chandoli Budruk: चांडोलीत ढगफुटीचा कहर! नारळाचे झाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू; ९० हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT