दाेन हजार रुपये घेताना पाेलिसाला पकडले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे.

सातारा : न्यायालयाच्या जप्ती वॉरंटप्रमाणे कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याच्या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

हेही वाचा - कणसे होंडातील 43 गाड्या चाेरीचे रहस्य उलगडले
 
विश्‍वास दत्तात्रय सपकाळ असे हवालदाराचे नाव आहे. याबाबत संबंधित तक्रारदारावर न्यायालयाने जप्ती वॉरंट काढले होते. त्यानुसार कारवाई न करण्यासाठी सपकाळ याने त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला.

त्यानुसार केलेल्या पडताळणीमध्ये दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार राजवाडा येथील लक्ष्मी रसवंतीसमोर दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना सपकाळ यास पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होती.

जरुर वाचा -  ताई तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत

उपअधीक्षक अशोक शिर्के, निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार संजय साळुंखे, भरद शिंदे, विजय काटवटे, संजय अडसूळ, प्रशांत ताटे, मारुती अडागळे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश येवले, नीलेश वायदंडे, शीतल सपकाळ यांचा या कारवाईत सहभाग होता. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिर्के यांनी केले आहे.

हेही वाचा -  ...अन्‌ बलात्कारी सापडला जाळ्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Havaldar Took Bribe Of Two Thousand Rupees