"सलमा अल्ला को प्यारी हुई' असे म्हणत त्याने दागिने काढून घेतले

"सलमा अल्ला को प्यारी हुई' असे म्हणत त्याने दागिने काढून घेतले

सातारा : संतोष पोळने 15 जानेवारी 2016 ला डोक्‍यात रॉड घालून सलमा शेखचा खून केल्याची साक्षी धोम- वाई खून खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली. 
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर धोम- वाई खून खटल्यांची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहात आहेत. या वेळी सहायक सरकारी वकील मिलिंद ओक, ज्योती मांढरेचे वकील विक्रम काकडे उपस्थित होते.
 
सलमाच्या खून प्रकरणी ज्योतीची साक्ष नोंदवण्यात आली. 15 जानेवारी 2016 ला संतोष पोळ याने सलमा शेख हिला बोलावून घेतले. त्या वेळी मी तुला इंजेक्‍शन देतो बरे वाटेल, असे तो तिला म्हणाला. त्यावर माझी तब्येत बरी आहे. इंजेक्‍शन कशाला, असा प्रश्‍न तिने केला. त्यामुळे चिडून संतोष पोळने तिच्या डोक्‍यात रॉड मारला. त्यामुळे सलाम खाली पडून तडफडू लागली. त्यानंतर संतोष पोळने आणखी दोन फटके तिच्या डोक्‍यात मारले. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर "सलमा अल्ला को प्यारी हुई' असे म्हणत त्याने तिच्या जवळील दागिने काढून घेतले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष ज्योतीने न्यायालयात दिली.

सर तपासणीमध्ये ज्योती मांढरेने पोलिस निरीक्षक वेताळ यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याबाबतचा तिने पोलिस अधीक्षकांना दिलेला अर्ज ओळखला. त्यावरील सही स्वतःचीच असल्याची कबुली दिली. मात्र, त्यातील मजकूर खोटा असून, तो संतोष पोळ याच्या सांगण्यावरून लिहिला असल्याचे तिने न्यायालयात सांगितले. त्यानंतर ती व संतोष मुंबईत ज्या लॉजवर राहिले होते तेथील रजिस्टर तिने ओळखले. संतोष पोळ याने ज्योती मांढरे हिचा सरतपास घ्यायचा आहे, असे सांगत न्यायालयाकडे अर्ज सादर केला. त्या अर्जावर ऍड. उज्ज्वल निकम यांनी आक्षेप घेतला. संतोष पोळ न्यायालयाचा वेळ वाया घालवत न्यायदानाचे काम लांबवत असल्याचे सांगितले. त्यांनी पोळच्या अर्जावर तीव्र हरकत घेतली. त्या अर्जावर न्यायालयाने निर्णय प्रलंबित ठेवला आहे. खटल्याची पुढील सुनावणी गुरुवारी (ता. 12) होणार आहे.

हेही वाचा : ...म्हणून उज्ज्वल निकमांनी दिला आंध्र प्रदेशातील खटल्याचा दाखला

वाचा : माझ्‍यासमोरच अंगणवाडी सेविकेचा खून

वाचा : मोबाईल-पिस्तुल प्रकरणः डॉ. संतोष पोळची येरवड्यात रवानगी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com