KOP20J65517_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान...कृष्णाकाठी  आली मगर ः कुठल्या गावी वाचा 

संजय कुंभार

दुधोंडी (सांगली) : नागराळे, इनामपट्टा, पुणदी परिसरातील कृष्णा नदीकाठावर मगरींचा वावर वाढला आहे. नुकत्याच दोन तीन दिवसापूर्वी इनाम पट्टा परिसरात एका मगरीने नदीकडेला घातलेल्या अंड्यातून सुमारे दहा ते बारा मगरीची पिल्ले जन्माला आली आहेत. त्या परिसरात तर मगरींचा सारखाच वावर वाढला आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांसह नागरिकांमधून भितीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने या परिसरातील नदीकाठावरील माहिती घेऊन मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे कृष्णा नदीकाठावर मगरींचा वावर अलीकडे वाढला आहे. मगरी बिनधास्तपणे नदीतून बाहेर येऊन नदीकाठी वर संचार करीत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांतून सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

या अगोदरही नागराळे परिसरात मासेमारी करणाऱ्यावर मगरीने हल्ला केला होता. सुदैवाने तो या हल्ल्यात बचावला होता. दोन तीन दिवसापूर्वी नागराळे इनाम पट्टा पूनदी परिसरातील नदीकाठावर दहा ते बारा मगरीची पिल्ली आढळली आहेत. अद्यापही ती पिल्ली तिथेच आहेत. त्या परिसरात असणाऱ्या पिल्लामुळे मगरीचा येथे वरचेवर वावर वाढला आहे. 
वन विभागाने या परिसराची पाहणी करून त्या पिल्लाला सह मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

रात्री अपरात्री शेतकरी नदिकाठी शेतात पिकांना पाणी पाजण्यासाठी जात असतात. त्यामुळे या मगरींपासून शेतकऱ्यांना धोका आहे. तरी या मगरींचा बंदोबस्त करावा 

इंद्रजीत पवार 
नागराळे शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT