Central team arrives in Sangli to learn about Corona measures 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक सांगलीत दाखल

अजित झळके

सांगली : कोरोना उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक आज सांगलीत दाखल झाले. तीन दिवस हे पथक जिल्ह्यात असणार आहे. पथकातील सदस्यांनी आज महापालिकेच्या वॉररूममध्ये जाऊन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाची माहिती घेतली. महापालिकेकडून राबविल्या जात असलेल्या उपाययोजनाबाबत पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. 


जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र शासनाने स्थानिक यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी राकेश शर्मा यांच्यासह दोघांचे पथक सांगलीत पाठवले आहे. या पथकाने महापालिकेच्या वॉररूमला सकाळी 10 वाजता भेट दिली. वॉररुमधून कोरोना रुग्णांसाठी आणि उपाययोजनांसाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली.

या वेळी महापालिकेच्या वॉररूमधील अहवालांची तपासणी केली. उपायुक्त राहुल रोकडे आणि आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी पथकातील सदस्यांना माहिती दिली. या वेळी शहर कार्यक्रम अधिकारी समर पवार, नीलम कांबळे आणि मनपाच्या वैद्यकीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर मनपा क्षेत्रातील अनेक कोविड रुग्णालयांना तसेच मनपाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रानासुद्धा पथकाने भेट देऊन पाहणी केली. दरम्यान या पथकाकडून महापालिकेच्या रूग्णवाहीकेचीही तपासणी केली. 
 


जिल्ह्यातील लसीकरण मोहीम बंद पडली आहे. या स्थितीत वाढत्या रुग्णसंख्येवर योग्य उपचार होत आहेत का? रुग्णालयांची व्यवस्था कशी आहे? जिल्हा पातळीवरील नियोजन कसे आहे, याची संपूर्ण पाहणी हे पथक करेल. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाला भेट, खासगी रुग्णालयांना भेट, रुग्णांशी संवाद असा त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT