chain snatching in kolhapur  
पश्चिम महाराष्ट्र

पत्ता सांगताय, थांबा !

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  ः राजारामपुरी परिसरातील काटकर माळ येथे भरदुपारी दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील पाऊण तोळ्याची सोन्याची माळ हिसडा मारून लंपास केली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद सुलोचना महादेव जाधव (वय 60, रा. दौलतनगर) यांनी दिली.

हे पण वाचा - सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

पोलिसांनी दिलेली माहिती, दौलतनगर येथे सुलोचना महादेव जाधव राहतात. त्या धुण्याभांड्याचे काम करतात. काल दुपारी त्या कामासाठीच काटकर ममाळ परिसरात जात होत्या. येथील एस.टी. कॉलनीतून दोघे मोटारसायकलस्वार चोरटे आले. त्यांनी जाधव यांना एस.टी. कॉलनीचा पत्ता विचारला. तेवढ्यात मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पाऊण तोळ्याची सोन्याची माळ हिसडा मारून पळविली. त्यानंतर ते दोघे चोरटे दौलतनगरच्या दिशेने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जाधव यांनी ओरडा केला. तसे नागरिक जमा झाले. त्यांनीही चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हाती लागले नाहीत. अखेरीस जाधव यांनी रात्री उशिरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. परिसरातील सीसी टीव्ही आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

Weight Gain Foods: तुमचं वजन वाढवायचंय का? मग आहारात 'या' पदार्थांचा नक्की समावेश करा!

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

SCROLL FOR NEXT