Charatanchai in the western part of Atpadi despite heavy rains
Charatanchai in the western part of Atpadi despite heavy rains 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी पश्‍चिम भागात भरपूर पाऊस पडूनही चाराटंचाई 

सदाशिव पुकळे

झरे : आटपाडी पश्‍चिम भागामध्ये पाऊस भरपूर प्रमाणात पडून सुद्धा चारा टंचाई भासू लागली आहे. पाऊस पडला तो भरपूर पडला. पाण्यामध्ये खरिपातील पिके राहिल्यामुळे सडून गेली होती. त्यामुळे जनावरांना चारा मिळेना. चाऱ्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. 

अतिवृष्टी झाल्यानंतर जमिनीला वापसा नसल्याने पेरणी उशीरा झाली असल्याने लगेच जनावरांसाठी चारा कुठून आणायचा हा गंभीर प्रश्न बनला आहे. सध्या उसाचे वाडे विकत मिळत आहे. उसाचे वाढे विकणारी वाहने फिरताहेत. वीस गऱ्याची पेंडी दहा रुपयाला तर दहा गऱ्याचीपेंडी पाच रुपये याप्रमाणे वाड्याची विक्री सुरू आहे. 

रब्बीच्या पेरण्या झाल्या परंतु लगेच चारा उपलब्ध झाला नाही. ओढे-नाले तलावे पाण्याने तुडुंब भरले असले तरी लगेच चारा कुठून आणायचा ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे चारा विकत घेऊन जनावरे जगवल्या शिवाय पर्याय नाही. दूध दुखते जनावराचे प्रमाण वाढले असल्याने त्यांनाही चारा विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे जनावरांना घातलेला खर्चसुद्धा दुधाच्या बिलातून निघत नाही. अशी अवस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. चारा मुबलक होण्यासाठी आणखी महिना दीड महिना लागणार आहे. तोपर्यंत चारा विकत घेऊन गुरेढोरे कशीबशी जगवावी लागणार आहेत. 

पेरणी उशीरा...
खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्याने तलाव तुडुंब भरले, ओढे-नाले वाहु लागले परंतु जमिनीला वपसा नसल्याने पेरणी उशीरा झाली. त्यामुळे चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. आणखी महिना-दीड महिना चाराटंचाई ही भासणार आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT