पश्चिम महाराष्ट्र

खुनातील संशयित सुटल्यावरून लक्षतीर्थ वसाहतीत दोन गटांत हाणामारी

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - लक्षतीर्थ वसाहत येथील पिंटू मिसाळ खूनप्रकरणातील संशयित सुटल्यानंतर दोन गटांत काल सायंकाळी जोरदार हाणामारी झाली. काठ्या, विटांसह दगडांचा वापर करत दोन्ही गटांनी वाहनांची तोडफोड केली. हाणामारीत दोघे जखमी झाले.

अचानक घडलेल्या या प्रकरामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रभर येथे पोलिस बंदोबस्त होता. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

लक्षतीर्थ वसाहत येथील पिंटू मिसाळ यांचा २०१० मध्ये पंचगंगा घाटाजवळील शेतात खून झाला होता. या प्रकरणातील काही संशयितांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यातील काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यातील काहीजण आज बाहेर आले. त्यांनी आपल्या समर्थकांसह आज सायंकाळी सातच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहत येथे जल्लोष केला. त्याचवेळी त्यांना मिसाळ यांच्या नवव्या पुण्यस्मरणाचा फलक निदर्शनास आला. त्यांनी तो फाडला. त्याशेजारील हातगाडी फोडत याठिकाणी उभ्या असणाऱ्या तरुणांना मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले.

दरम्यान, याची माहिती मिसाळ समर्थकांना समजली. ते त्यांना जाऊन भिडले. दोन्ही गटांकडून दगड, विटा, काठ्या व बांबूचा वापर करण्यात आला. दोन्ही गटांनी रस्त्यावर लावलेल्या एका अलिशान मोटारीसह तीन मोटारींची व दोन मोटारसायकलींची तोडफोड केली. केएमटी बसवरही दगडफेक केली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. दगडफेकीत ऋषिकेश खोंदल व राकेश कोळी जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती तपासात पुढे आल्याचे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले; पण संबधित संशयित खूनप्रकरणातून निर्दोष की जामिनावर सुटले हे समजू शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर दोन्ही गट पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. 

अलिशान मोटारीचे नुकसान...
शिवाजी पेठेतील सचिन काटकर लक्षतीर्थ वसाहत येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते; पण त्यांच्या मोटारीलाही दोन्ही गटांनी लक्ष्य बनवले. मोठमोठे दगड घालून गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यात मोटारीचे मोठे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT