Closed schools & open placed secretly given to gymnasiums, institutions by Congress-NCP corporators of Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

बंद शाळा, जागा चोरीछुपे व्यायामशाळा, संस्थांना महापालिकेच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचे प्रताप

जयसिंग कुंभार

सांगली ः महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळा भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला आहे. या जागांमध्ये व्यायामशाळा व खासगी संस्थांकडे वेगवेगळ्या कारणांसाठी द्यायचे मनसुबे आहेत. त्याबरोबरच पालिकेच्या मालकीच्या जागा नगरसेवक मंडळींच्या संस्थांना द्यायचे प्रकारही उघडकीस आले आहेत. गेल्या जुलैमध्ये झालेल्या महासभेत हे प्रकार घडले आहे. त्यासाठी ठराविक मंडळींनाच त्यासाठी झुकते माप दिल्याचे स्पष्ट होते. 

पालिकेच्या दक्षिण शिवाजीनगरातील खुली जागा व बांधीव इमारत विकसित करण्यासाठी अजिंकीयन फौंडेशनला द्यायचा ठराव 2018 मध्ये प्रलंबित ठेवला होता. आता या ठरावाला उपसूचना कॉंग्रेसचे सदस्य संतोष पाटील यांनी दिली आहे.

त्यांनी मिरजेतील दोन जागा राष्ट्रवादीचे नगरसेवक मैन्नुद्दीन बागवान यांच्या अमन युथ असोशिएशनला 29 वर्षे द्यावी, असे सुचवले आहे. या जागेवर व्यायामशाळा सूर असून ती विनाशुल्क असल्याचे ठरावात म्हटले आहे. आधी नऊ वर्षे कराराने ही जागा देण्यात आली होती. त्याप्रमाणेच सांगलीतील एक जागेसाठीही चेतक व्यायाम मंडळास आणखी तीस वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र या जागांसाठी जुनेच भाडे असेल. 

येथील वडर कॉलनीतील एका शाळेच्या खोल्या एका क्रीडा मंडळाला 29 वर्षे कराराने देण्याचा ठराव कॉंग्रेस सदस्य प्रकाश मुळके यांच्या उपसूचनेद्वारे केला आहे. ही शाळा सध्या बंद आहे. आता या शाळेच्या खोल्या एका मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मंडळाकडून शाळेत व्यायामशाळा सुरू केली जाणार आहे. 

थेट नाव घालून ठराव कसे केले?

महापालिकेच्या शाळा बंद पडत असतील तर त्या ठिकाणी खासगी शिक्षण संस्थांना भाडेपट्टीने या जागा दिल्या जाऊ शकतात. शाळांच्या जागांचा वापर आज व्यायामशाळेसाठी उद्या व्यापारी संकुलासाठीही होऊ शकतो. त्याला पायबंद घातला पाहिजे. व्यायामशाळांसाठी दिलेल्या जागा खुल्या लिलाव काढून का दिल्या नाहीत. थेट नाव घालून ठराव कसे केले? हे सर्व ठराव बेकायदेशीर आहेत. ते आयुक्तांनी रद्द केले पाहिजेत.

- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

‘ही’ इच्छा पूर्ण झाली तर ३ कोटी लोकांना मदत करणार! लालबागच्या राजाच्या चरणी भक्ताची अनोखी इच्छा, चिठ्ठी सोशल मीडियावर Viral

Marathi News Live Updates : कार खोल दरीत कोसळली; चौघांचा मृत्यू

IND vs JPN, Playing XI: जसप्रीत बुमराह संघाबाहेर, वैभव सूर्यवंशीला मिळाली का संधी? पावसामुळे किती ओव्हरची होणार मॅच?

SCROLL FOR NEXT