mangalvedha
mangalvedha 
पश्चिम महाराष्ट्र

#milkagitation मंगळवेढयात 90 हजार लिटर दूधाचे संकलन थांबले

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे मंगळवेढयातील 1 लाख 90 हजार लिटर दूधाचे संकलन थांबले. चोखोबाच्या समाधीस दूधाचा अभिषेक घालून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली

दूध दरात कपात केल्यामुळे पशुपालकांचे कंबरडे मोडले म्हणून स्वाभीमानी शेतकरी संघटनेने दुधास प्रतिलिटर 30 रू दर व पाच रु अनुदान द्यावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी तळसंगी येथे रस्त्यावर दुध ओतून सरकारच निशेध करण्यात आला याशिवाय अरळी येथे दुधाचे आंदोलन करण्यात आले मंगळवेढयातील काही भागात दुधाचे वाटप करण्यात आले, ग्रामीण भागात काही ठिकाणी ग्रामदेवतांला दुधाचा अभिषेक घालून दर करण्याची बुध्दी दयावी अशी प्रार्थना करण्यात आली. दूध दराच्या आंदोलनामुळे हॅटसन, सोनई, प्रभात, सह्याद्री, जिल्हा दूध संघ यांचे 1 लाख 90 हजाराचे संकलन थांबले. शेतकय्रांची आर्थिक कोंडी गेल्या वर्षापासून सुरू आहे.

या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार गणेश लव्हे यांना दिले. या  आंदोलनात अ‍ॅड राहूल घुले, येताळा भगत समाधान क्षिरसागर श्रीमंत केदार अनिल बिराजदार विजय भरमगोंडे म्हाळाप्पा शिंदे सुनिल गरंडे दगंबर गरंडे भाऊसाहेब गरंडे आदी सहभागी झाले, आंदोलनाच्या धसक्याने पशुपालक व्हाटसअप, टी.व्ही च्या संपर्कात असून दरात दरवाढीच्या बातमीकडे पशुपालकाचे लक्ष लागले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT