Comfort to the common man: fall in vegetable prices; brinjal 40 to 60 rupees per kg 
पश्चिम महाराष्ट्र

सामान्यांना दिलासा : भाजीपाला दरात घसरण;  वांगी 40 ते 60 रूपये किल

घनशाम नवाथे

सांगली : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर हळूहळू भाजीपाला आवक वाढू लागली आहे. तसेच भाजीपाला दरात देखील थोडी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 120 ते 140 रूपये किलोपर्यंत गेलेली वांगी सध्या 40 ते 60 रूपये किलोने विकली जात आहेत. शंभरीतला कांदा देखील 70 रूपये किलोपर्यंत घसरला आहे. 

दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे भाजीपाला आवक घटली होती. परिणामी दरात प्रचंड वाढ झाली होती. वांगी 120 ते 140 रूपये किलोपर्यंत गेली होती. परंतू हळूहळू वांगीची आवक वाढू लागली आहे. परिणामी दर सध्या 40 ते 60 रूपये किलो इतका आहे. गवारी देखील 80 रूपयेवरून 60 रूपये किलोपर्यंत उतरली आहे. तसेच भेंडी 40 रूपये, दोडका 40 ते 60 रूपये, पावटा 40 रूपये, घेवडा 40 रूपये, कारली 40 रूपये, ढबू मिरची 40 रूपये, कोबी व फ्लॉवर 40 ते 60 रूपये किलो याप्रमाणे दर आहे. 

पालेभाजांची आवकही वाढली आहे. मेथीची आवक जास्त असून दहा रूपये पेंडी विकली जात आहे. तसेच अन्य पालेभाज्यांमध्ये शेपू 10 रूपये, कांदा पात 15 रूपये, चाकवत 15 रूपये, तांबडा माठ 10 रूपये, तांदळ 10 रूपये, पालक 15 रूपये पेंडी याप्रमाणे दर आहे. कोथिंबीरची आवकही वाढली असून पेंडी 10 रूपयाला विकली जात आहे. 

दिवाळीत कांदा शंभर रूपये किलोपर्यंत वधारला होता. परंतू आवक वाढली असून दरात घसरण होऊन 60 ते 70 रूपये किलो दराने चांगला कांदा विकला जात आहे. लसूण 120 ते 140 रूपये किलो, आले 60 रूपये, टोमॅटो 30 रूपये, बटाटा 50 रूपये, हिरवी मिरची 40 रूपये किलो याप्रमाणे दर आहे. शेवगाही बाजारात आला असून दहा रूपयाला तीन नग विकले जात आहेत. 

मटण-चिकनला मागणी- 
दिवाळीमध्ये मटण-चिकनला मागणी फारसी नसते. परंतू दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आल्यामुळे मटण-चिकनला मागणी वाढली आहे. मटण 600 रूपये तर चिकन 220 ते 240 रूपये किलो याप्रमाणे दर आहे. अंडी किरकोळ विक्री 6 रूपयाला एक नग आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'या' लाडक्या बहिणींवर होणार कारवाई, मंत्री आदिती तटकरेंचा थेट इशारा..

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Shirur Police Crackdown: शिरूर पोलिसांची गावठी व बेकायदा दारूविक्रीवर धडक कारवाई; हातभट्ट्या उध्वस्त

Latest Marathi News Live Update : काँग्रेस नक्षलवाद्यांना हुतात्मे संबोधते आणि त्यांच्यासाठी अश्रू ढाळते - भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला

नवरा वकील, सासू माजी न्यायाधीश ! तरीही केला हुंडयासाठी छळ; त्विशा शर्माने मैत्रिणीला केलेला मेसेज चर्चेत

SCROLL FOR NEXT