पश्चिम महाराष्ट्र

शिक्षक बॅंकेच्या सभेत समितीचा गोंधळ 

सकाळवृत्तसेवा

सातारा - प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभेत व्याजदर कमी करा, ही मागणी लावून धरत विरोधकांनी शिट्ट्या आणि घोषणाबाजी केल्याने सत्ताधारी शिक्षक संघाच्या संचालकांनी सर्व विषय मंजूर म्हणत 40 मिनिटांत सभा गुंडाळली. सभा संपली, तरी शिक्षक समितीचे सभासद घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी सर्वांना हॉलच्या बाहेर काढून दार बंद केले. त्यानंतर शिक्षक समितीच्या नेत्यांनी हॉलशेजारील एका झाडाखाली प्रतिसभा घेऊन शिक्षक संघाच्या बॅंकेतील कारभारावर ताशेरे ओढले. दरम्यान, नोटाबंदीनंतरही शिक्षक बॅंकेच्या ठेवीत या आर्थिक वर्षात 40 कोटी आठ लाखांनी वाढ होऊन 22 कोटी 12 लाख झाल्याचे राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले. 

सांगलीत शिक्षक बॅंकेच्या सभेत झालेल्या हाणामारीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील शिक्षक बॅंकेच्या सभेत काय होणार, अशी सर्वांना उत्सुकता होती. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता; पण येथे हाणामारीऐवजी घोषणाबाजीच रंगली. केवळ 40 मिनिटांत सभा संपली. शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पुष्कर मंगल कार्यालयात सभा झाली. या वेळी उपाध्यक्ष महेंद्र अवघडे, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार शेटे व सभासद उपस्थित होते. 

राजेंद्र घोरपडे म्हणाले, ""नोटाबंदीचा परिणाम होऊनही आर्थिक वर्षात ठेवींमध्ये 40 कोटी आठ लाखांनी वाढ होऊन 22 कोटी 12 लाखांने वाढ झाली आहे. कर्जाच्या तुलनेत ठेवींमध्ये झालेली भरीव वाढ बॅंकेवरील लोकविश्‍वास स्पष्ट असून, आर्थिक वर्षात तीन कोटी 82 लाख रुपये नफा झाला आहे. 

विषयपत्रिकेचे वाचन अनिलकुमार शेटे यांनी केली. दोनच विषय वाचून झाल्यावर शिक्षक समितीच्या सभासदांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. व्याजदर कमी करा, आमच्या मागण्या मान्य करा, शिक्षक समिती जिंदाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांनी प्रश्‍न विचारण्यासाठी माईकची मागणी केली. त्यावर सर्वांच्या प्रश्‍नांना आम्ही उत्तरे देऊ सर्वांनी शांत राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी केले; पण समितीचे सदस्य ऐकण्यास तयार नव्हते. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले; पण समितीचे सदस्य माईकची मागणी करत होते, तर सत्ताधारी संचालक मात्र माईक देण्यास तयार नव्हते. यातूनच पुन्हा घोषणाबाजीला सुरवात झाली. सुरवातीची दहा मिनिटे सभा चालली. त्यानंतर 30 मिनिटे सभेत गोंधळ, घोषणा आणि शिट्ट्याच ऐकू येत होत्या. शिक्षक समिती झिंदाबाद, व्याजदर कमी करा, कर्मचाऱ्यांचे पैसे कोणाच्या घशात असे फलकही समितीच्या सदस्यांनी सभागृहात दाखविले. सुरवातीपासून शांत बसलेल्या संघाच्या सदस्यांनी समितीच्या सदस्यांचा गोंधळ पाहून त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. शेवटी समिती व शिक्षक संघाच्या सदस्यांचे घोषणायुद्ध थांबत नसल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्व विषय मंजूर म्हणताच संघाच्या सभासदांनी मंजूर म्हणत साथ दिली, तर विरोधी समितीच्या सभासदांनी मात्र नामंजूर म्हणून घोषणा देण्यास सुरवात केली. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर करत वंदे मातरम्‌ सुरू केले. यानंतरही शिक्षक समिती व संघाचे सदस्य घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले, त्या वेळी मंगल कार्यालयाच्या बाहेर दोन्ही बाजूच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू होती. यानंतर शिक्षक समितीच्या संचालक, सभासद व नेत्यांनी मंगल कार्यालयाच्या जवळच प्रतिसभा घेऊन शिक्षक संघाच्या बॅंकेतील कारभारावर ताशेरे ओढले. 

बॅंकेने घेतलेले निर्णय : 
वैयक्तिक कर्जमर्यादा 40 वरून 50 लाखांवर 
सभासदांना वैद्यकीय मदत एक लाखापर्यंत 
मृत सभासदांच्या कर्ज व्याजदरात 2.5 टक्के सूट 
कऱ्हाड शहरात नवीन शाखा सुरू 
दीर्घ मुदत कर्ज मर्यादा 21 वरून 25 लाख 
सभासदांना दहा टक्के लाभांश 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT