11 टक्के उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा कोरोनाने मृत्यू; तज्ज्ञांची माहिती
11 टक्के उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा कोरोनाने मृत्यू; तज्ज्ञांची माहिती 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाने आरोग्य यंत्रणेला जाग; लोकांकडून लाखोंची करवसुली अन् दवाखाने सात

शैलेश पेटकर

सांगली : दीडेक वर्षापूर्वी महापालिकेचे दवाखाने-प्रसूतिगृहे म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून सुरू होते; मात्र कोरोनाच्या आगमनानंतर कधी नव्हे ते या दवाखान्यांमध्ये आता जाग आली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांतील साडेपाच लाख लोकसंख्येसाठी पालिकेचे फक्त सात दवाखाने आणि दोन प्रसूतिगृहे आहेत. आरोग्यपंढरी म्हणून सांगली-मिरजेचा लौकिक मात्र गेल्या दोन दशकांत महापालिकेच्या स्थापनेनंतर पालिकेच्या दवाखान्यांना उतरती कळा लागत गेली.

कधी काळी पालिकेचे दवाखाने पूर्ण क्षमतेने चालायचे. नगरसेवक विश्‍वस्त म्हणून या दवाखान्यांची काळजी करायचे, मात्र खासगी हॉस्पिटलच्या रेट्यात महापालिका नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारीच विसरून गेली. अगदी टाळे लागण्याची वेळ अनेक दवाखान्यांवर आली, मात्र गेली दीड-दोन वर्षे या दवाखान्यांमध्ये जान आली आहे. आजघडीला सात दवाखान्यांमध्ये ७ डॉक्‍टर्स आणि ३५ जणांचा स्टाफ आता कार्यरत आहे. हळूहळू का असेना हे दवाखाने कात टाकत आहेत. प्रसूतीसह बाह्यरुग्ण विभागात संख्या वाढतेय. सरासरी दवाखान्यात दररोज साठ ते ऐंशी रुग्ण येतात, त्यांना मोफत उपचारांसह औषधे दिली जातात. तसेच प्रसूतिगृहात गर्भवती मातांची मोफत सोनोग्राफी तपासणी केली जाते. याशिवाय औषधोपचारही मोफत केले जातात, मात्र लोकांचा रेटा वाढल्याशिवाय इथे सुविधा येणार नाहीत.

आजघडीला महापालिका क्षेत्रात सांगलीवाडी, गावभाग, पंचमुखी मारुती रस्ता, वडर कॉलनी, मिरज दवाखाना, कुपवाड दवाखाना आणि आयुर्वेदिक उपचार केंद्र अशा सात ठिकाणी दवाखाने आहेत. तसेच सांगली आणि मिरजेत प्रसूतिगृहे आहेत. कधीकाळी सांगली-मिरजच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील महिला या प्रसूतिगृहांमध्ये प्रसूतीसाठी यायच्या. त्यासाठी आधीपासून नोंदणी असायची.

मात्र हळूहळू महापालिकेने सारी जबाबदारी सिव्हिलवर ढकलली. त्यामुळे पालिकेची प्रसतिगृहे ओस पडत गेली. आता दवाखान्यांकडून रुग्णांना मिळणारा प्रतिसाद पाहता गरीब रुग्णांची पावले आपोआप महापालिकेच्या रुग्णालयांकडे वळत आहेत. याचा फायदा घेत महापालिकेने लोकांसाठी अधिकाधिक सुविधा द्यायला हव्यात. प्रसूतिगृहात दररोज तीस ते चाळीस महिला तपासणीसाठी येतात. मोफत सोनोग्राफीची व्यवस्था केली आहे. तसेच गर्भवती मातांना पूरक औषधोपचार केले जातात. प्रसूतिपश्‍चात आरोग्यसुविधा दिल्या जात आहेत.

अद्ययावत साधनांची गरज

महापालिकेच्या दवाखान्यांमधील उपचाराचे स्वरूप आज अतिशय प्राथमिक स्वरूपाचे आहे. महापालिका म्हणवून घेताना त्यात अत्याधुनिक उपचार यंत्रणेची अपेक्षा आहे. एमआरआय, सीटी स्कॅन, एक्‍स-रे अशा वैद्यकीय निदानाच्या सुविधांसाठी रुग्णांना खासगीत जावे लागते. गेल्या काही वर्षांत महापालिकेने रिक्त पदे कायमस्वरुपी भरलेली नाहीत. तांत्रिक स्टाफही रिक्त आहे. एकूणच पालिकेने या दवाखान्यांकडे जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Updates : लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन!

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

SCROLL FOR NEXT