confusion related to syllabus cutting and changes in belgaum education department face problem 
पश्चिम महाराष्ट्र

अभ्यासक्रम कपातीबाबत माहिती न दिल्याने विद्यार्थ्यांत गोंधळ

मिलिंद देसाई

बेळगाव : शाळा सुरु न झाल्याने अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याची माहिती शिक्षण, खात्यातर्फे देण्यात आली आहे. मात्र कोणता अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण होत असुन कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षण खात्याने स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

शाळा सुरु होण्यास अधिक दिवसांचा विलंब होणार असल्याने शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात कपात करण्यासाठी तज्ञ कमिटीची नेमणुक केली होती. त्यानुसार अभ्यासक्रमात 30 टक्‍क्यांची कपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शाळा वेळेत सुरु न झाल्याने शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 टक्‍क्यांपेक्षा अधिक कपात करण्यात येईल अशी माहिती दिली होती. परंतु 30 टक्‍क्यांपेक्षा अधिक प्रमाणात अभ्यासात कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे 70 टक्‍के अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवावा लागणार आहे. तसेच शाळा सुरु झालेल्या नाहीत त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यास सुरुवात केली आहे. 

मात्र कोणता अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वच शिक्षकांची अडचण झाली, असुन अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्यानंतर त्याचवेळी शिक्षण खात्याने वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देणे आवश्‍यक होते. जानेवारी महिन्यापासुन शाळा सुरु होण्याची शक्‍यता आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 9 ते 10 पर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. तर त्यानंतर इतर वर्गांचा विचार केला जाणार आहे. मात्र शाळा सुरु झाल्यानंतर वेळेत अभ्यासक्रम पुर्ण, करण्यासाठी शिक्षकांना धडपड करावी लागणार आहे. त्यामुळे शाळा सुरु होण्यापुर्वीच अभ्यासक्रम कपातीबाबत माहिती देणे आवश्‍यक होते. असे मत शिक्षकांमधुन व्यक्‍त होत आहे.

"अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र याबाबतचा आदेश अद्याप बजावण्यात आलेला नसुन शाळा सुरु होण्यापुर्वी अभ्यासक्रम कपात करण्याबाबतचा आदेश येण्याची शक्‍यता आहे. जानेवारी महिन्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय होऊ शकतो."

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT