Congratulations to Maharashtra Chief Minister Shinde from the Central Committee belgaum Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सीमाप्रश्नी चर्चेसाठी वेळ द्यावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘मध्यवर्ती समिती’कडून अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर मध्यवर्ती समितीच्या वतीने शुक्रवारी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवण्यात आले आहे.

तसेच शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये तुम्ही सीमाप्रश्न सुटावा यासाठी तुरुंगवास भोगला आहे. तसेच आपल्याला या प्रश्नाची पूर्ण जाणीव असून, तुम्ही सीमावासीयांसाठी एक आशास्थान आहात. त्यामुळे सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी, याकरिता आपण चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती समितीला वेळ द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हे पत्र पाठविले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिंदे यांनी सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे मध्यवर्ती समितीकडून त्यांच्याकडे याबाबतही काही आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील व सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा समितीकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT