solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या वतीने गाजर, कापसाच्या बोळ्याचे वाटप

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : गेल्या साडेचार वर्षात आश्वासनाचे गाजर दाखविल्याचा निषेध म्हणून गाजरांचे व जाहीर सभेत पंतप्रधान मोदींची खोटी आश्वासने ऐकू नयेत म्हणून नागरिकांना कापसाचे बोळे वाटण्यात आले. कॉंग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडने हे उपरोधिक आंदोलन आज मंगळवारी दुपारी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापुरात येत आहेत. गेल्या साडेचार वर्षा प्रमाणे उद्याही  त्यांच्या भाषणात फक्त आणि फक्त गाजर आणि जुमलौं की बरसात होणार आहे.त्याच्या अनुषंगाने काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड च्या वतीने हे आंदोलन केल्याचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी सांगितले. 

शहर अध्यक्ष प्रकाश वाले  यांच्या उपस्थितीत लोकांना गाजर व मोदींना 15 लाख रुपये मागण्यासाठी कापडी पिशव्या वाटण्यात आले. उद्याच्या सभेत जाण्याच्या आधी लोकांनी कानात कापसाचा बोळा घालून जावे म्हणून कापसाचा बोळा देखील वाटण्यात आला. 

मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात प्रत्येक भारतीय नागरिकांच्या हातात केवळ आश्वासनाची घंटा दिली आहे. त्यामुळे प्रतिकात्मक रुपात घंटाही वाटण्यात आल्या.

यावेळी अशोक कलशेट्टी, हेमा चिंचोळकर, नागनाथ कदम, अनिल मस्के, मनोज टींगे, संघमित्रा चौधरी, रहमान काझी, भारतीताई एप्पलपल्ली, असलम मुजावर, सुमनताई जाधव, नूर अहमद नालवार,श्रीकांत दासरी सुरज घंटे, नहीदा कमले, शोभाताई बॉम्बे, मीनाक्षीताई बंकापुरे, वीरण बावी, श्रीनिवास पोगुल,बसवराज मेत्रे, बसवराज बजरंगी, अप्पू विभुते, विनोद पुजारी, प्रभाकर गवडी, बसवराज ज्याबा, सिद्धाराम कोरे, अभिषेक तांदळे व पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT