पश्चिम महाराष्ट्र

माय-लेकराची कोरोनामुळे ताटातूट; आई रुग्णालयात, बाळाला गायीचे दूध

१६ दिवसांचे बाळ चिक्काबागेवाडीमध्ये मेव्हण्याकडे आहे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बीम्समध्ये २२ वर्षीय विवाहितेला ऑक्सिजन (oxygen) मिळत नसल्याची तक्रार तिच्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या (belgaum collector) सहाय्यकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय विवाहितेची दोन आठवड्यांपूर्वी प्रसूती झाली आहे. तिला सुरवातीला खासगी रुग्णालयात (private hospital) दाखल केले होते. तेथे ऑक्सिजन नसल्यामुळे बेळगावला (belguam) जिल्हा रुग्णालयात (बीम्स) (district hospital) दाखल होण्याबाबत कळविले. परंतु, येथेही पुरेशा स्वरुपात ऑक्सिजन मिळत नसल्याने मुलगीला त्रास होत असल्याची कैफियत वडिलांनी मांडली.

बैलहोंगल तालुक्यातील सानिकोप्प येथील इराप्पा नामक व्यक्तीने (५) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची भेट होऊ शकली नाही. पण, त्यांनी यावेळी माध्यमांपुढे बीम्समधील ऑक्सीजन समस्या मांडली. विवाहित मुलीची पंधरा दिवसांपूर्वी प्रसूती झाली. प्रसूती व्यवस्थित झाल्यामुळे तिला घरी घेऊन आलो. पण, तेथे कोरोनाची (covid 19) लक्षणे दिसली. त्यासाठी चाचणी केली. त्यात तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, तेथे ५ दिवस ठेवून घेऊन लाखो रुपये वैद्यकीय उपचार शुल्क आकारले.

आमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ऑक्सिजनची टंचाई असल्याचे दाखवत मंगळवारी रात्री सरकारी रुग्णालयात दाखल होण्याबाबतचा सल्ला दिला. यामुळे मुलगीला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, येथेही ऑक्सिजन मिळत पुरेशा स्वरुपात मिळत नाही. यामुळे तिला त्रास होत आहे. मुलगीची प्रकृती व्यवस्थित आहे. पण, तिला ऑक्सीजन कमी मिळत असल्याने चिंता आहे. १६ दिवसांचे बाळ चिक्काबागेवाडीमध्ये मेव्हण्याकडे आहे. तर दोन वर्षांची नात रामदुर्गाला आहे. तर दोन्ही मुलांची आई बेळगावला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आई एकीकडे व मुले दुसरीकडे असल्याने बाळाला गायी, शेळीचे दूध देत आहोत, अशी व्यथा त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT