corona new logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना अपडेट : हॉटस्पॉट मणदूरमध्ये चार रूग्ण...आंधळी, निगडी, अमरापूरातही रूग्ण...96 वर्षाच्या वृद्धेची कोरोनावर मात 

सकाळवृत्तसेवा

सांगली-  जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत आज आणखी सात जणांची वाढ झाली. आंधळी (ता. पलूस), निगडी (ता. शिराळा), अमरापूर (ता. कडेगाव) येथे प्रत्येकी एक आणि "हॉटस्पॉट' मणदूर (ता. शिराळा) येथे आणखी चार रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकड 279 वर पोहोचला आहे. आज दिवसभराची विशेष घटना म्हणजे विठलापूर (ता. आटपाडी) येथील 96 वर्षाच्या वृद्धेने "कोरोना' वर मात केली. ही वृद्धा जिल्ह्यातील सर्वात वयस्कर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या त्रिशतकाकडे चालली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजअखेर 218 रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध शहरात 49 रूग्ण तर महापालिका क्षेत्रात 12 रूग्ण आढळून आले आहेत. आजअखेर 166 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 104 रूग्ण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. तर कोरोनामुळे 9 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. 
आज सायंकाळपर्यंत सात नवे रूग्ण आढळले. त्यामध्ये आंधळी येथील 45 वर्षाचा पुरूष, निगडी येथील 32 वर्षाची महिला, अमरापूर येथील 68 वर्षाची महिला आणि मणदूर येथे 37 वर्षाचा पुरूष, 33 वर्षाची महिला, 27 वर्षाची महिला तसेच 8 वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 104 रूग्णांपैकी साळसिंगे (ता. खानापूर), कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ), विटा (ता. खानापूर), वांगी (ता. कडेगाव), अंकले (ता.जत), रिळे (ता. शिराळा), मालगाव (ता. मिरज) येथील रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर आज निंबवडे, विटा, विठलापूर येथील प्रत्येकी एक आणि मणदूरचे चार, पलूसमधील सहाजण असे 13 जण कोरोनामुक्त झाले. यापैकी विठलापूर येथे मुंबईहून आलेल्या सातजणांच्या कुटुंबातील 96 वर्षाच्या वृद्धेला 10 जून रोजी कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. या वृद्धेने कोरोनावर मात केली. 
 

जिल्हा दृष्टीक्षेपात- 

  • आजचे नविन रूग्ण- 07 
  • उपचार घेणारे रूग्ण- 104 
  • बरे झालेले रूग्ण- 166 
  • आजअखेर मृत- 09 
  • एकुण पॉझिटीव्ह- 279 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT