coronavirus impact salshinge sangli district
coronavirus impact salshinge sangli district 
पश्चिम महाराष्ट्र

हुश्‍श...वाचलो बाबा! असे का म्हणतायत साळशिंगकर?

सकाळ वृत्तसेवा

लेंगरे (सांगली) - मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाली असून तो कोरोनाबाधित साळशिंगे (ता. खानापुर) या गावचा जावाई आहे. हा व्यक्ती मुंबईहून काही कामानिमित्त विटा येथे आला होता. विटा येथे आल्यानंतर भोवळ आली होती. त्यानंतर विटा ग्रामिण रुगणालयात दाखल केले होते. त्यावेळी चौकशी केली असता सांळशिंगे सासरवाडी असल्याची माहिती त्याने आरोग्य विभागाला दिली होती. त्याचा अहवाल पाझिटीव्ह आल्यानंतर साळशिंगेवासीयांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र चौकशीअंती त्याचा गावाशी संपर्क आला नसल्याचे समोर आले. 

तहसीलदार ऋषीकेत शेळके, तालुका आरोग्य अधिकारी अनिल लोखंडे यांनी तत्काळ सांळशिंगेत जाऊन संबंधिताच्या पाहुण्यांची चौकशी केली; मात्र तो कोरोनाबाधिताशी संपर्क आला नसल्याचे समोर आले. तहसीलदार शेळके म्हणाले, की विट्यात उपचारासाठी दाखल झालेला हा मुळचा कराड तालुक्‍यातील असणारा पोलिस मुंबई येथील पोलिस दलात कार्यरत आहे. या व्यक्तीला भोवळ आल्याने तो उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारसाठी दाखल होत असताना सांळशिंगे सासरवाडी असल्याचे सांगितले.

उपचारासाठी दाखल झालेल्या या पोलिस कर्मचाऱ्याचे कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याचे स्वॅब मिरज येथे पाठविले होते. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर प्रशासनाने सर्तकता बाळगत तत्काळ सांळशिंगेत चौकशी केली. मात्र हा व्यक्ती मुंबईवरुन गावात आला नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे लोकांनी घाबरुन नका असे आवाहन त्यांनी केले आहे. 

बातमी वाऱ्यासारखी... 
सांळशिगेच्या जावयाला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी वार्यासारखी पसरली.अहमदाबाद येथून कोरोनाबांधिताची भिती होते तो पर्यतच ही बातमी गावात धडकली.त्यामुळे अगोदरच भितीच्या सावटाखाली असलेले सांळशिंगेतील लोक अधिकच घाबरुन गेले होते.मात्र हा व्यक्ती सांळशिंगे येथे गेलाच नसल्याचे शहनिशा प्रशासनाकडून प्रत्यक्ष जाऊन केली.यावेळी सांळशिगेतील त्यांच्या सासरवाडीतील लोकांशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे निर्दशनास आले असल्याचे आरोग्य विभाग,स्थानिक प्रशासनाने सांगितल्यानंतर सांळशिगकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT