hunnymoon cuple
hunnymoon cuple 
पश्चिम महाराष्ट्र

पारनेरचं ते कपल आता कंटाळलं हनिमूनला...महिन्यापासून अडकलंय गोव्यात

मार्तंड बुचुडे

पारनेर ः कोरोना व्हायरसचा फटका सर्वांनाच बसला आहे. अनेक मजूरांचे रोजगार गेले आहेत. तर रस्त्यावरचे छोटे मोठे व्यावसाय करणारांचे ते व्यवसायही बंद झाले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद आहेत. हॉटेल बंद झाल्याने तेथे काम करणा-या कामगारांचे रोजगार गेले आहेत.

नवदाम्पत्यासही कोरोनाने पछाडून टाकले आहे. तर काहींची लग्नच लांबवली आहेत. लॉकडाउनमुळे जिकडेतिकडे लोक अडकून पडले आहेत. पारनेरमध्ये एका नवदाम्पत्याबाबत तर अजबच किस्सा घडला आहे.

लग्नाळूंना अडचण

अनेक लग्नाळू तरूण तरूणींपुढे पुढे  मात्र वेगळेच यक्ष प्रश्न ऊभे राहिले आहेत. अनेकांची लग्न जमण्यामध्ये अाता लॉकडाऊममुळे  अडचणी येत आहेत. त्यातच अनेकांची जमलेली लग्न लॉकडाऊनमुळे लांबली आहेत. काहीच्या बाबतीत तर मुलगा व  मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम झाला. मात्र या लॉकडाऊनमुळे लग्न करणे तर बाजूलाच राहिले. त्यांना साधा  साखरपुडा अगर सुपारीचा कार्यक्रमसुद्धा करता येत नाही. अाता त्यांना लॉकडाऊन संपण्याची वाट पहाण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरला नाही. 

महिनाभरापासून गोव्यात

तालुक्यातील एका गावातील तरूणाचे मार्च महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर हनिमूनला जाण्याची प्रथा असली तरी त्याची तयारी अगोदरपासूनच होते. अर्थातच  हे दोघांच्या विचारानेच ठरलं. त्या तरूणानेही हनिमूनची तयारी केली. खर्च कमी यावा जवळचे ठिकाण फिक्स झाले. जवळचे ठिकाण कोणते तर गोवा. जीवाचा गोवा करायला गेले. पहिले चारपाच दिवस मजेत घालवले. माघारी फिरायचं तर 20 मार्चला लॉकडाऊन पडला. त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले. या घटनेला आता एक महिना उलटून गेला आहे.

आता नको वाटतोय हनिमून

सुरूवातीला आनंददायी वाटणारे हनिमून त्यांना आता नकोसे वाटायला लागले आहे. कारण दररोज पैशांची चणचण भासते आहे. आता घरची परिस्थिती जरा बरी आहे म्हणून चार-पाच दिवसांना पैसे पाठविले जातात. तेवढ्यावरच त्यांना दिवस काढावे लागत आहेत. संचारबंदी असल्याने त्यांना हॉटेलच्या बाहेरही फिरता येत नाही. त्यामुळे ते हनिमूनला पुरते वैतागले आहेत. सुरूवातीला हनिमूनसाठी अधीर झालेले जोडपे सक्तीच्या हनिमूनला कंटाळले आहे.

जाताना दोघं येताना तिघं...

आता हा लॉकडाउन आणखी लांबणार असल्याच्या बातम्या रोजच येत आहेत. त्यामुळे त्यांच्या पोटात भीतीने गोळा येत आहे. अशाही स्थितीत त्यांचे मित्र त्यांना चिडवित आहेत. हनिमूनला जाताना दोघे आणि येताना तिघे या गाण्याप्रमाणे झाले नाही म्हणजे मिटले, असे टोमणे मारीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT