"Covid Special" train came at Miraj station; hospital on wheels 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज स्थानकात "कोव्हिड स्पेशल' दाखल; धावते रुग्णालय

सकाळवृत्तसेवा

मिरज : सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णांवर उपचारांसाठी तोकडी पडत असलेली यंत्रणा यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने खास 22 डब्यांची "कोव्हिड स्पेशल" ही रेल्वे मिरजेला पाठवली आहे.

सध्या ही मिरज रेल्वे स्थानकातील दुसऱ्या क्रमांकाच्या फलाटावर उभी असून तिची रेल्वेस्थानकातील मालधक्‍क्‍याच्या परिसरात खास व्यवस्था करण्यात येणार आहे. पुढील आदेशानंतर रेल्वेचे हे रेल्वेच्या या धावत्या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. 

सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या मिरज येथील कोरोना रुग्णालयात उपचार करण्यासाठी आरोग्य विभागास अपुऱ्या यंत्रणेमुळे मर्यादा येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सांगली मिरज परिसरातील काही खासगी रुग्णालयांच्या खाटाही आरक्षित केल्या आहेत. परंतु नजीकच्या भविष्यकाळात रुग्णांची संख्या अचानक वाढली तर त्यांची हेळसांड होऊ नये. आणि आयत्यावेळी व्यवस्थेची तारांबळ उडू नये यासाठी रेल्वेची "कोव्हिड स्पेशल" ही विशेष 22 डब्यांची गाडी रेल्वे मिरज रेल्वे स्थानकात आणून उभी करण्यात आली आहे.

ही स्पेशल गाडी म्हणजे रेल्वेचे धावते रुग्णालयच आहे. यामध्ये अतिदक्षता विभाग, आयसोलेशन विभाग, क्वारोंटाईन विभाग अशा सर्व सोयींनी सुसज्ज असलेली ही "कोव्हिड स्पेशल" रेल्वे मुख्य रेल्वे स्थानकापासून दूर अंतरावर उभी केली जाणार आहे. त्याच ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यासाठीचा रस्ता, पाणी, वीज, आणि अन्य सुविधांची तयारीही सध्या रेल्वे स्थानकात सुरू आहे. यासाठीचे डॉक्‍टर परिचारक आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतरच येत्या काही काही दिवसात रेल्वेचे कोव्हिड स्पेशल हे धावते रुग्णालय सुरू होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT