बेळगावला एअर क्राफ्ट म्युझियम निर्माण करा : अण्णासाहेब जोल्ले
बेळगावला एअर क्राफ्ट म्युझियम निर्माण करा : अण्णासाहेब जोल्ले Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावला एअर क्राफ्ट म्युझियम निर्माण करा : अण्णासाहेब जोल्ले

अमोल नागराळे

निपाणी : बेळगावमध्ये एअर क्राफ्ट म्युझियम निर्माण करण्याची मागणी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे बंगळूर येथे केली. मागणीचे निवेदन खासदार जोल्ले यांनी मंत्री राजनाथ सिंग यांना गुरुवारी (ता. २१) दिले. निवेदन स्वीकारून मंत्री राजनाथ सिंग यांनी बेळगावमध्ये एअर क्राफ्ट म्युझियम निर्माण करण्याची ग्वाही दिली. यावेळी धर्मादाय, वक्फ व हज मंत्री शशिकला जोल्ले उपस्थित होत्या.

गुरुवारी (ता. २१) बंगळूर येथे राष्ट्रीय सुरक्षा समिती सदस्यांची बैठक झाली. बैठकीनंतर खासदार जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर बेळगावला एअर क्राफ्ट म्युझियम निर्माण करण्याची मागणी केली. त्यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असून येथे मराठा लाईट इन्फंट्रीचे प्रशिक्षण केंद्र आहे.

शिवाय येथे विमानतळ असून अन्य सुरक्षाविषयक विभाग कार्यरत आहेत. सध्या गोवा येथील केंद्रात कालबाह्य झालेली विमाने थांबून आहेत. तीच विमाने बेळगावला स्थलांतरीत करून त्याला म्युझियमचे स्वरुप द्यावे. यामुळे तरूण, तरूणींसह सर्वांना विमानाचा अधिक अभ्यास होईल. शिवाय तरूण, तरूणींना सुरक्षा सेवेत दाखल होण्यासाठी प्रेरणा मिळेल. एअर क्राफ्ट म्युझियम निर्मितीमुळे शहराच्या भव्यतेत व लौकिकात अधिक भर पडण्यास मदत होईल. म्युझियम पाहण्यासाठी लोकांची वर्दळ वाढेल यामुळे या ठिकाणाला पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त होईल. मंत्री राजनाथसिंग यांनी निवेदन स्वीकारून बेळगावला एअर क्राफ्ट म्युझियम निर्मितीची ग्वाही दिली असल्याचे खासदार जोल्ले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT