पश्चिम महाराष्ट्र

अख्खा गाव हळहळला; भिंत कोसळून आईसह लेकराचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : खानापूर तालुक्यात (khanapur) पावसामुळे मोठे नुकसान झाले असून इटगीमध्ये (itagi) (ता. खानापूर) सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे (heavy rain) घराची भिंत कोसळून एका महिलेसह ३ वर्षीच्या लहान मुलाचा ढिगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू (crime) झाला. तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

खानापूर तालुक्याच्या सर्रास भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने वीज खांब कोसळले आहेत. तसेच वीज पुरवठा खंडित झाला असून ठिकठिकाणी घरांची पडझड झाली आहे. इटगी येथे पडलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने दोड्डव्वा रुद्राप्पा पटेद (वय ५५) तसेच अभिषेक सुरेश पटेद (वय ३) हे दोघे ढिगाऱ्याखाली सापडल्याने ठार झाले. तर सुरेश पटेद, मंजुनाथ पदेड व चंद्रकांत पटेद हे जखमी झाले आहेत.

रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच याबाबत नंदगड पोलिस स्थानकात (itagi police station) माहिती दिल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच नदंगड पोलिस स्थानकाचे पोलिस उप निरीक्षक उस्मान अवटी यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र गावात घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने पदेड कुटुंबाला तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT