धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात 394 शिक्षकांचा मृत्यू

शिक्षकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात 394 शिक्षकांचा मृत्यू

बेळगाव : कोविड नियंत्रण कार्य आणि बेळगाव (belgaum) लोकसभा पोट निवडणूक, मस्की व बसव कल्याण विधानसभा पोटनिवडणूकीत सेवा बजावलेल्या अनेक शिक्षकांना (teachers) कोरोनाची लागण (corona positive) झाली असून यापैकी 30 शिक्षकांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (covid-19 2nd stage) आतापर्यंत राज्यातील 394 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिक्षकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एप्रिल महिन्यात बेळगाव लोकसभा पोट निवडणूकीसह मस्की व बसव कल्याण विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. यावेळी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 30 शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक शिक्षक विजापूर जिल्ह्यातील दगावले आहेत. येथील 30 शिक्षकांचा तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 22 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. बरेच कोरोनाबाधित शिक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. या विषयाकडे शिक्षण खात्याने तातडीने लक्ष देत शिक्षकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात 394 शिक्षकांचा मृत्यू
मुसळधार पावसासह 'तौक्ते' चक्रीवादळ रत्नागिरीत जिल्ह्यात दाखल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 जून ते 15 मे पर्यंत मृत्यू झालेल्या शिक्षकांची संख्या पुढीलप्रमाणे -

  • बेळगाव - 14

  • कारवार - 3

  • चिक्कोडी - 22

  • हावेरी - 11

  • बागलकोट - 10

  • विजापूर - 39

  • धारवाड - 9

कोरोना मुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत शिक्षण खात्याने तातडीने सरकारला माहिती दिली आहे. मधुमेह, रक्तदाब, अस्थमा आदी आजार असलेल्या शिक्षकांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. परिणामी हे प्रमाणात अधिक असल्याचा निष्कर्ष आरोग्य खात्याने काढला आहे.

धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात 394 शिक्षकांचा मृत्यू
Cyclone Tauktae : रत्नागिरीतील 365 जणांना सुरक्षित स्थळी हलवले

"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 14 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती देण्यात आली आहे."

- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com